Pooja Chavan Suicide Case: भाजप नगरसेवक उलगडणार पूजा चव्हाणच्या मृत्यूचं गूढ?; प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 09:26 AM2021-02-17T09:26:13+5:302021-02-17T11:59:59+5:30
Pooja Chavan Death Case bjp corportor key witness: शिवसेना नेते संजय राठोड नॉट रिचेबल; भाजपचा नगरसेवक पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार
पुणे: शिवसेनेचे नेते संजय राठोड (Shivsena Leader Sanjay Rathod) यांच्या अद्यापही नॉट रिचेबल आहेत. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात (Pooja Chavan Death Case) राठोड यांचं नाव पुढे आल्यापासून राठोड माध्यमांसमोर आलेले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला राठोड अनुपस्थित होते. आज कॅबिनेटची बैठक होत आहे. या बैठकीला तरी राठोड उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संजय राठोड यांनी राजीनामा दिला की नाही?; मातोश्रीवरुन आली महत्त्वाची माहिती
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून भारतीय जनता पक्षानं ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांवर दबाव असल्याचा थेट आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदारांची केवळ जुजबी चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. विशेष म्हणजे महत्त्वाच्या साक्षीदारांपैकी एक जण भाजप नगरसेवक आहे. पण तेदेखील या प्रकरणावर भाष्य करण्यासाठी, माहिती देण्यासाठी पुढे आलेले नाहीत.
आधी फाशी, मग चौकशी कशी?, वनमंत्री राठोड यांचा सेनेकडून बचाव; विरोधकांना संयमाचा सल्ला
पूजा चव्हाणनं आत्महत्या केली की भोवळ येऊन पडल्यानं तिचा मृत्यू झाला, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. पूजा इमारतीमधून पडल्यावर तिथे चार जण उपस्थित होते. अरुण राठोड, विलास चव्हाण, भाजप नगरसेवक पूजाला घेऊन रुबी हॉल क्लिनिकमध्ये पोहोचले. त्यामुळे हे या प्रकरणातील मुख्य साक्षीदार आहेत. मात्र पोलिसांनी अद्याप तरी त्यांची सखोल चौकशी केलेली नाही.
...म्हणून संजय राठोड माध्यमांसमोर येत नाहीत; संजय राऊतांनी सांगितलं नेमकं कारण
भाजप नगरसेवक यांना पूजा चव्हाणबद्दलची माहिती मिळताच ते तिच्या इमारतीजवळ पोहोचले. त्यांनीच अरुण राठोडकडून ऑडिओ क्लिप्स मिळवल्या. मात्र, या प्रकरणातल्या चार महत्त्वाच्या साक्षीदारांची पोलिसांनी पुरेशी चौकशी झालेली नाही. अरुण राठोड आणि अनिल चव्हाण नेमके कुठे आहेत, याची माहिती पोलिसांकडे नाही. भाजप नगरसेवक देखील अद्याप माध्यमांसमोर आलेले नाहीत. भाजप नगरसेवक माध्यमांसमोर आल्यास अनेक महत्त्वाच्या बाबींचा उलगडा होऊ शकेल. पूजा चव्हाणच्या मृत्यूचं गूढ उकलण्यास त्यामुळे मदत होऊ शकते.