पूजा खेडकर यांची सर्व कागदपत्रे तपासली जाणार; होऊ शकते बडतर्फीची कारवाई...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 03:42 PM2024-07-12T15:42:14+5:302024-07-12T15:42:40+5:30

महाराष्ट्र केडरच्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर सध्या चर्चेत आल्या आहेत.

Pooja Khedkar Latest News : All documents of Pooja Khedkar will be checked; Dismissal action may be taken | पूजा खेडकर यांची सर्व कागदपत्रे तपासली जाणार; होऊ शकते बडतर्फीची कारवाई...

पूजा खेडकर यांची सर्व कागदपत्रे तपासली जाणार; होऊ शकते बडतर्फीची कारवाई...

Pooja Khedkar Latest News : महाराष्ट्र केडरच्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) सध्या चर्चेत आल्या आहेत. दररोज पूजा यांच्याबद्दल नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यांनी चक्क एका डीसीपी रँकच्या अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याची माहिती आज समोर आली आहे. दरम्यान, आता पूजा यांनी नियुक्तीच्या वेळी सादर केलेल्या सर्व प्रमाणपत्रांची चौकशी केली जाणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूजा खेडकर यांनी सादर केलेल्या सर्व प्रमाणपत्रांची तपासणी केली जाणार आहे. नियुक्तीदरम्यान त्यांनी फक्त ओबीसी किंवा अपंगत्व प्रमाणपत्रच नाही, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र देखील सादर केले आहे. तपासादरम्यान एकही कागदपत्र बनावट आढळून आल्यास त्यांना तत्काळ नोकरीतून काढून टाकण्यात येणार आहे. या प्रमाणपत्रांची पडताळणी न करता त्यांची नियुक्ती कशी झाली, याचा तपास सध्या सुरू आहे. यासोबतच पूजाला व्हेरिफिकेशनसाठी अनेकवेळा बोलावूनही ती हजर झाली नाही, याचीही चौकशी होणार आहे.

पूजा खेडकर आरोपांवर काय म्हणाल्या?
आपल्यावर सातत्याने होत असलेल्या आरोपांवर पूजा खेडकर यांनी चौकशीसाठी समिती स्थापन केल्यास, समितीसमोर माझी बाजू मांडेन, असे म्हटले आहे. 

चोराला सोडविण्यासाठी डीसीपींना फोन
मुंबई पोलिसांनी राज्य सरकारकडे एक अहवाल पाठविला आहे, ज्यात पूजा यांनी एका चोराला सोडवण्यासाठी चक्क डीसीपी रँकच्या अधिकाऱ्याला फोन केल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण 15 मे रोजीचेच आहे. पनवेल पोलीस ठाण्यात चोरीच्या आरोपीला पोलिसांनी पकडले होते. तेव्हा पूजा यांनी कथितरित्या पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांना फोन करुन इश्वर उत्तरवाडे याला सोडण्यास सांगितले. 

पूजा यांनी फोनवर पानसरेंना आपली ओळख सांगितली, परंतू पानसरेंना त्यांच्यावर विश्वास बसला नाही. त्यामुळे पोलिसांनी या कॉलवर कोणतीही कारवाई केली नव्हती. उत्तरवाडे आजही न्यायालयीन कोठडीत आहे. पूजा यांचे कारनामे उघड होऊ लागल्यावर पानसरे यांना या फोन कॉलची आठवण झाली आणि त्यांनी लगेचच पुण्याचे जिल्हाधिकारी आणि गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करून याची माहिती दिली.

कोण आहे पूजा खेडकर?
IAS पूजा खेडकर नुकत्याच चर्चेत आल्या आहेत. युपीएससी पास केल्यानंतर सुरुवातीचे प्रशिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची पुण्यातून वाशिम जिल्ह्यात बदली झाली. पूजा यांनी पुण्यात स्वतंत्र केबिन आणि कर्मचाऱ्यांची मागणी केली होती. याशिवाय, त्यांनी आपल्या खासगी ऑडी वाहनावर महाराष्ट्र सरकार लिहून, त्यावर अंबर दीवाही लावला होता. यावरुन वाद निर्माण झाला होता. 

Web Title: Pooja Khedkar Latest News : All documents of Pooja Khedkar will be checked; Dismissal action may be taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.