पूनम महाजन यांनी स्वीकारली भाजयुमोची सूत्रे
By admin | Published: December 23, 2016 01:45 AM2016-12-23T01:45:04+5:302016-12-23T01:45:04+5:30
परिवर्तनाच्या या प्रवासात युवक कार्यकर्त्यांनी विकासाचा मार्ग अनुसरला पाहिजे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या
नितीन अग्रवाल / नवी दिल्ली
परिवर्तनाच्या या प्रवासात युवक कार्यकर्त्यांनी विकासाचा मार्ग अनुसरला पाहिजे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या (भाजयुमो) नवनियुक्त अध्यक्षा व खासदार पूनम
महाजन यांनी केले. गुरुवारी महाजन यांनी अध्यक्षपदाची सूत्रे येथे स्वीकारली.
महाजन म्हणाल्या, ‘‘परिवर्तनाच्या या दिवसांत सकारात्मक बदलांसाठी मोर्चाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे.
जगामध्ये भारताला उच्चतम स्थान प्राप्त होणार असून त्यात युवकांची सगळ््यात जास्त भूमिका असेल. त्या इमारतीचा पाया घालण्याची संधी युवकांना मिळत असल्याबद्दल आम्ही भाग्यशाली आहोत. - पूनम महाजन
भाजयुमोचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सरचिटणीस अरूण सिंह यांच्या उपस्थितीत महाजन म्हणाल्या की,‘‘नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी देशाला पुढे नेण्याचे स्वप्न पाहिले आहे. युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्याला साकारायचे आहे. आम्ही परिवर्तनाचे वाहक बनून वारसाला पुढे नेण्यासाठी सैनिक बनावे.’’