कोल्हारे गावात आढळले खवले मांजर
By admin | Published: October 18, 2016 05:17 AM2016-10-18T05:17:33+5:302016-10-18T05:17:33+5:30
कर्जत तालुक्यातील नेरळजवळील कोल्हारे गावात शनिवारी रात्री खवले मांजर आढळून आले.
नेरळ (रायगड) : कर्जत तालुक्यातील नेरळजवळील कोल्हारे गावात शनिवारी रात्री खवले मांजर आढळून आले. त्यावेळी ग्रामस्थांनी सर्पमित्र श्याम कडव यांना बोलावले. हे खवले मांजर एका बिळात शिरत असल्याचे आढळून आले. त्यावेळी सर्पमित्र श्याम कडव यांनी क्षणाचा विलंब न करता ते खवले मांजर पकडले.
खवले मांजरांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. यामुळे प्रत्येक निसर्गमित्र आणि वन विभाग यांनी या प्राण्यांच्या रक्षण, संवर्धनासाठी पाऊल उचलले आहे. संपूर्ण अंगावर खवले असलेला खवले मांजर हा एकमेव सस्तन प्राणी असून इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्र्र्र्व्हेशन आॅफ नेचरच्या रेड डाटा बुकनुसार अत्यंत धोक्यात असलेल्या प्रजातीच्या यादीत समाविष्ट करण्यात आला आहे, असे सर्पमित्र श्याम कडव यांनी सांगितले आहे. (वार्ताहर)