खवले मांजर नामशेष होणाऱ्या प्रजातींच्या यादीत

By Admin | Published: February 20, 2016 02:21 AM2016-02-20T02:21:46+5:302016-02-20T02:21:46+5:30

‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन आॅफ नेचरच्या रेड डाटा बुक’नुसार नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींच्या यादीत खवले मांजराचा समावेश करण्यात आला आहे.

Poor cats in extinction list | खवले मांजर नामशेष होणाऱ्या प्रजातींच्या यादीत

खवले मांजर नामशेष होणाऱ्या प्रजातींच्या यादीत

googlenewsNext

सचिन लुंगसे ,  मुंबई
‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन आॅफ नेचरच्या रेड डाटा बुक’नुसार नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींच्या यादीत खवले मांजराचा समावेश करण्यात आला आहे. या प्राण्याच्या संरक्षण व संवर्धनासाठी रत्नागिरी वनविभाग सरसावला आहे. कोकणातील सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे. रत्नागिरी पोलिसांचीही याकामी मदत घेण्यात येत आहे.
खवले मांजर कोकणात सर्वत्र आढळते. मांस, चिनी औषधे व बुलेट प्रुफ जॅकेटसाठी जगभर त्याची हत्या होत आहे. ही प्रजाती अत्यंत धोक्यात आली आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकणात आढळणाऱ्या खवले मांजराला वाचवण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत ग्रामपंचायत, पोलिस पाटील यांना मांजराच्या संरक्षणासाठी आवाहनाचे पत्र व पोस्टर पाठवण्यात येत आहे. संपूर्ण कोकणात त्याच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. याबाबत जनजागृतीही करण्यात येत आहे. दर वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी जागतिक खवले मांजर दिन साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी २० फेब्रुवारी रोजी ‘जागतिक खवले मांजर दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने वन विभाग आणि सहयाद्री निसर्ग मित्र या संस्थेतर्फे खवले मांजर संरक्षण व संवर्धन यासाठी एक कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.खवले असलेला एकमेव सस्तन प्राणी
मुंगुसासारखा दिसणारा पण खवले असणारा हा प्राणी साधारणत: सर्व प्रकारच्या जंगलात आढळतो. फेलिडोटा कुटुंबातील हा प्राणी असून, तो निशाचर आहे. खवले मांजर हा खवले असणारा एकमेव सस्तन प्राणी आहे.
तो मांसाहरी वर्गातील असून वाळवी, मुंग्या व वारुळात राहणारे इतर जीव हे त्याचे मुख्य खाद्य असते. खवले मांजराला दात नसल्यामुळे ते खाण्यासाठी १० ते १२ इंच लांब जिभेचा उपयोग करते. खवले मांजर वर्षभरात ७० ते ८० कोटी ककडे वर्षभरात खाते आणि निसर्गचक्राचा तोल सांभाळते. खवले मांजरापासून मानवाला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो.मांजराचे वजन : ८ ते ३५ किलोपर्यंत
भारतीय खवले मांजराची लांबी (डोके व धड) ६०-७५ सेंटीमीटर असते. शेपूट ४५ सेंटीमीटर लांब असते. डोके लहान, तोंड लांबट व पुढे निमुळते असते. डोळे बारीक व कान फार लहान असतात. भारतीय खवले मांजर साधारणत: ८ ते ३५ किलोपर्यंत वाढते. त्याच्या अंगावर असलेले खवले हे किराटीन नामक द्रव्यापासून तयार होतात. पाय, पोट, कपाळ असा काही भाग सोडल्यास संपूर्ण अंगभर हे खवले असतात. धोक्याची जाणीव होताच खवले मांजर स्वत:च्या शरीराचा गोल भाग करून घेते. यामुळे त्याचे शत्रूपासून संरक्षण होते.भारतात दोन प्रजाती
खवले मांजराच्या अशिया खंडात चार आणि आफ्रिकेत चार अशा आठ प्रजाती सापडल्या आहेत. भारतीय खवले मांजर हिमालयाच्या दक्षिणेस मैदानी प्रदेशात व डोंगरांच्या उतरणीवर, पाकिस्तान व श्रीलंकेत आढळते. तसेच पाकिस्तान, श्रीलंकेत आढळते, तर चिनी प्रजाती हिमालय, आसाम, नेपाळ, ब्रह्मदेश, दक्षिण चीनमध्ये आढळते.

Web Title: Poor cats in extinction list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.