गरिबांच्या वसाहती ‘स्मार्ट’ बनवणार
By admin | Published: August 19, 2015 12:59 AM2015-08-19T00:59:05+5:302015-08-19T00:59:05+5:30
सोलापूर शहर स्मार्ट करताना गरिबांच्या वसाहतींना विविध सुविधा देऊन स्मार्ट करू तसेच गरिबांच्या घरांना सवलती देण्यासाठी महिनाभरात धोरण ठरवू,
सोलापूर : सोलापूर शहर स्मार्ट करताना गरिबांच्या वसाहतींना विविध सुविधा देऊन स्मार्ट करू तसेच गरिबांच्या घरांना सवलती देण्यासाठी महिनाभरात धोरण ठरवू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले़ गरिबांच्या पाठीशी शासन असल्याचेही ते म्हणाले़
कुंभारी येथील मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेतर्फे ५,१०० घरे बांधण्यात येत असून, त्यातील १,६०० घरांचे हस्तांतरण फडणवीस यांच्या हस्ते झाले. केंद्रीय कामगार मंत्री बंडारू लक्ष्मण, खा़ तपन सेन कार्यक्रमाला उपस्थित होते़
मुख्यमंत्री म्हणाले राज्यभरातच एक धोरण ठरवून गरिीबांना कमी खर्चात घरे मिळतील याचा विचार केला जाईल़ या गरिबांच्या वसाहतीमध्ये ड्रेनेज, पाणीपुरवठा आदी विविध सुविधा देऊन त्या स्मार्ट केल्या जातील़ स्मार्ट सोलापूर करताना गोरगरीब, दलित, आदिवासी कुटुंबांमध्ये परिवर्तन झाले पाहिजे़ त्यामुळे शहरे स्मार्ट करताना गरिबांना प्राधान्य देऊ, असेही ते म्हणाले़