गरिबांचा फ्रीज बाजारात दाखल

By Admin | Published: March 1, 2017 12:35 AM2017-03-01T00:35:40+5:302017-03-01T00:35:40+5:30

थंडी आता पूर्णपणे ओसरली असून, उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत

The poor people enter the freeze market | गरिबांचा फ्रीज बाजारात दाखल

गरिबांचा फ्रीज बाजारात दाखल

googlenewsNext


मोशी : थंडी आता पूर्णपणे ओसरली असून, उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना आता थंड पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. सालाबादप्रमाणे ‘गरिबांचा फ्रिज’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या
माठाचे बाजारात आगमन झाले
आहे. मात्र, माठासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत दुपटीने वाढ झाल्याने यंदा माठाच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेने दुप्पट राहणार आहेत.
नाशिक रस्ता, मोशी व भोसरीमध्ये लहान-मोठ्या आकारातील लाल, काळ्या रंगाचे माठ, रांजण आणि नळ लावलेले माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. त्यातच उन्हाचा कडाका वाढल्याने माठांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून, नागरिकांतून चांगली मागणी आहे. होळीनंतर माठांची मागणी वाढणार असून, या बाजारात तेजी येईल, असा माठ व्यावसायिकांचा अंदाज आहे. (वार्ताहर)
>व्यवसाय करणे अवघड
माठ खरेदी करताना ग्राहक काहीही भाव करतात. सांगितलेल्या दरापेक्षा निम्म्या दरात माठ खरेदी करण्याची अपेक्षा ठेवतात. त्यामुळे हा व्यवसाय परवडेनासा झाला आहे. मात्र, पर्याय नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी हा पारंपरिक उद्योग आम्हाला करावाच लागत आहे. त्यातच आज- काल गरिबांच्या घरातही इलेक्ट्रॉनिक फ्रिज आढळून येतो. त्यामुळे साहजिकच आमच्या व्यवसायावर परिणाम होतो, अशी खंतही कुंभार बांधवांनी व्यक्त केली.
>कच्च्या मालाच्या किमती दुप्पट
सद्य:स्थितीत १५०० रुपये एक मातीचा ट्रॅक्टर, ४०० रुपये एका छोटा टेम्पोभर माती असे कच्च्या मालाचे दर आहेत. तयार केलेले माठ शेकण्यासाठी लागणारे लाकूड ७ ते ८ रुपये किलोप्रमाणे विकत घ्यावे लागत आहे. माठ बनवण्यासाठी करावी लागणारी मेहनत व खर्च पाहता आता व्यावसायिक दृष्टिकोनातून माठ बनविणे आज परवडण्यासारखे नाही. यामुळेच माठांचे भाव दुपटीने वाढलेले आहेत. भोसरीमध्ये राजन कुंभार, श्रीहरी कुंभार, बाळा कुंभार, जयप्रकाश नाथ या व्यावसायिकांनी माठ विक्रीसाठी ठेवलेले आहेत. साधारणत: पौष महिन्यात (डिसेंबर, जानेवारी) या महिन्यात बनविलेल्या माठांमध्ये उन्हाळ्यात अत्यंत गार पाणी असते, असे व्यावसायिक सांगतात.
>मार्च, एप्रिल व मे या तीनच महिन्यांत माठांचा हंगाम असतो. माठ बनविण्याचे साहित्य अत्यंत महाग झाले आहे. त्यामुळे माठ बनविणेही कठीण झाले आहे. मात्र, तरीही आम्ही ग्राहकांना परवडतील असेच दर ठेवलेले आहेत. ग्राहकांनीही भाव न करता सहकार्य करावे.
- श्रीहरी कुंभार,
माठ व्यावसायिक

Web Title: The poor people enter the freeze market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.