महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात वाघांच्या संख्येत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 07:08 PM2019-07-29T19:08:19+5:302019-07-29T19:11:16+5:30

मध्यप्रदेशात सर्वाधिक वाघ; महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर

population of tigers increases in maharashtra and madhya pradesh | महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात वाघांच्या संख्येत वाढ

महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात वाघांच्या संख्येत वाढ

googlenewsNext

- अनिल कडू

परतवाडा (अमरावती) : महाराष्ट्राासह मध्यप्रदेशात २०१४ च्या तुलनेत सन २०१८ मध्ये वाघांची संख्या वाढली आहे. २०१८ च्या आकडेवारीनुसार मध्यप्रदेशात सर्वाधिक ५२६ वाघ आहेत. सन २०१४ मध्ये मध्यप्रदेशात ३०८ वाघ होते. तेव्हा मध्यप्रदेश देशपातळीवर तिसऱ्या स्थानावर होते. आता महाराष्ट्रात ३१२ वाघ असून मध्यप्रदेश देशात अव्वल स्थानी आहे.

महाराष्ट्रात २०१४ मध्ये १९० वाघ होते. त्यावेळी राज्य देशपातळीवर पाचव्या क्रमांकावर होते. २०१८ मध्ये महाराष्ट्रातील वाघांची संख्या ३१२ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आला आहे. अवघ्या चार वर्षांत महाराष्ट्रातील वाघांची संख्या १२२ ने वाढली आहे. राज्यस्तरावरील २०१८ मधील व्याघ्र गणनेची आकडेवारी जाहीर झाली असली, तरी प्रत्येक व्याघ्र प्रकल्पानुसार असलेल्या वाघांची आकडेवारी पुढील एक महिन्यात घोषित होणे अपेक्षित आहे.

२००६ मध्ये राज्यात १०३ वाघ होते. २०१० मध्ये वाघांची संख्या १६९ झाली. २०१४ मध्ये राज्यात १९२ वाघांची नोंद झाली. आता २०१८ मध्ये महाराष्ट्रात ३१२ वाघांची नोंद घेण्यात आली आहे. २०१४ मध्ये राज्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात १०० ते ११० वाघ, तर मेळघाटात ४५ ते ५० वाघ नोंदले गेले होते. तर पेंचमध्ये २५ ते ३० वाघ वास्तव्यास होते.

२०१८ मध्ये राज्यात वाघांची संख्या वाढल्यामुळे या व्याघ्र प्रकल्पांमध्येही वाघांची संख्या वाढली आहे. एकट्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात शंभर वाघांचा सांभाळ करण्याची क्षमता आहे. मेळघाटात वाघांची संख्या ५० वर स्थिरावली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची क्षमता बघता ज्या अन्य व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघांची संख्या अधिक आहे, तेथून काही वाघ मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात स्थलांतरित करण्याचा विचार वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. 

२०१४ मध्ये राज्यात १९० वाघ होते. २०१८ मध्ये राज्यात ३१२ वाघांची नोंद झाली. चार वर्षांतील ही सर्वात मोठी कामगिरी आहे.
- एम. एस. रेड्डी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प
 

Web Title: population of tigers increases in maharashtra and madhya pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.