अश्लील मेसेज पाठवणारा गजाआड

By admin | Published: March 27, 2017 03:28 AM2017-03-27T03:28:43+5:302017-03-27T03:44:37+5:30

शिवसेना प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांना अश्लील मेसेज पाठवणाऱ्या आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली असून

Porn message sender | अश्लील मेसेज पाठवणारा गजाआड

अश्लील मेसेज पाठवणारा गजाआड

Next

पुणे : शिवसेना प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांना अश्लील मेसेज पाठवणाऱ्या आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली असून, त्याला न्यायालयाने २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दीपककुमार प्यारेलाल गुप्ता (वय ४०, रा. घरकुल, शिवाजीनगर, जळगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आर. एन. गट यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोऱ्हे यांना आरोपीने २१ ते २७ फेब्रुवारीदरम्यान अश्लील आणि धमकीचे मेसेज पाठवले होते. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबईचे सहआयुक्त देवेन भारती, पुण्याच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही याप्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी पुणे व मुंबई पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.
दरम्यान, आरोपीने आणखी काही महिला लोकप्रतिनिधींना अशाच प्रकारे मेसेज केल्याचे समोर आले होते. त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. शिवाजीनगर पोलिसांनी त्याला आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहामधून न्यायालयाकडून प्रोड्यूस वॉरंट घेऊन ताब्यात घेतले. त्याला अटअक करण्यात आली असून, रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. मेसेजमागील उद्देश आणि त्यासाठी कोणी प्रवृत्त केले याचा तपास करायचा असून, सिमकार्ड जप्त करण्यासाठी आरोपीच्या पोलीस कोठडीची सरकारी वकील एस. जे. बागडे यांनी मागणी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करीत त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) व्ही. एच. दरेकर करीत आहेत.

Web Title: Porn message sender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.