विद्यार्थिनींशी अश्लील चाळे; कुटुंबीयांना अ‍ॅट्रॉसिटीची धमकी

By admin | Published: September 19, 2016 01:15 AM2016-09-19T01:15:12+5:302016-09-19T01:15:12+5:30

तीन शाळकरी मुलींना खाऊचे आमिष दाखवून घरात बोलावून त्यांच्याशी अश्लील चाळे केल्याची घटना खेड तालुक्यातील वांजळे या गावी घडली.

Pornographic activities with students; Family threat to atrocity | विद्यार्थिनींशी अश्लील चाळे; कुटुंबीयांना अ‍ॅट्रॉसिटीची धमकी

विद्यार्थिनींशी अश्लील चाळे; कुटुंबीयांना अ‍ॅट्रॉसिटीची धमकी

Next


राजगुरुनगर : पाचवी, सहावीत शिकणाऱ्या तीन शाळकरी मुलींना खाऊचे आमिष दाखवून घरात बोलावून त्यांच्याशी अश्लील चाळे केल्याची घटना खेड तालुक्यातील वांजळे या गावी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी दुपारी, इयत्ता पाचवी आणि सहावीत शिक्षण घेणाऱ्या तीन मुलींना आरोपी गंगाराम नामदेव खंडे ( वय ४६, रा. वांजळे, ता. खेड) याने राहत्या घरासमोर त्या खेळत असताना, चॉकलेट देतो, असे सांगून घरात बोलावून घेतले. त्यानंतर त्याने घराला आतून कडी लावली आणि त्यांच्याशी अश्लील चाळे केले. त्यांच्यापैकी एका मुलीने ही घटना आपल्या आजीला सांगितली. आजी याबाबत त्याला जाब विचारायला गेली असता, उलट याबाबत मीच तुमच्यावर जातिवाचक शिवीगाळ केली म्हणून अ‍ॅट्रॉसिटी दाखल करून सर्र्वांंना आत टाकतो, अशी धमकी दिली. त्यामुळे त्यानंतर मुलींचे कुटुंबीय चार दिवस गप्प राहिले. मात्र, काल त्यांच्यापैकी एक मुलगी फिर्यादी झाली आणि इतर दोन मुली आणि कुटुंबीयांसह खेड पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. आरोपी खंडे हा त्या गावाचा पोलीस पाटील आहे. या मुली वांजळे या गावातून डेहणे गावात शिक्षण घेण्यासाठी दररोज तीन किलोमीटर ये-जा करीत असतात. आरोपी यापूर्वीही आमच्या मागे येत होता, असे मुलींनी फिर्यादित म्हटले आहे.
खेड पोलिसांनी, या फिर्यादीवरून आरोपी पोलीसपाटील गंगाराम खंडे याच्याविरोधात भा.दं.वि. कलम ३५४(अ) (१) नुसार आणि
बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ८,१०,१२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नसून, तो फरारी आहे. (वार्ताहर)

Web Title: Pornographic activities with students; Family threat to atrocity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.