वाहतूककोंडीवर पोर्टेबल सिग्नल

By admin | Published: March 4, 2016 12:46 AM2016-03-04T00:46:23+5:302016-03-04T00:46:23+5:30

छोटे-मोठे रस्ते, गल्लीबोळ, छोटे चौक अशा ठिकाणी अचानक उद्भवणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी उपाय शोधला असून, आता चक्क ‘पोर्टेबल सिग्नल’ सिस्टीमद्वारे

Portable Signals on Transporters | वाहतूककोंडीवर पोर्टेबल सिग्नल

वाहतूककोंडीवर पोर्टेबल सिग्नल

Next

पुणे : छोटे-मोठे रस्ते, गल्लीबोळ, छोटे चौक अशा ठिकाणी अचानक उद्भवणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी उपाय शोधला असून, आता चक्क ‘पोर्टेबल सिग्नल’ सिस्टीमद्वारे आपत्कालीन वाहतूक नियमन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, पोलिसांना मिरवणुका, आंदोलने, मोर्चे आणि खोदकामामुळे होणाऱ्या वाहतूककोंडीच्या वेळी या यंत्रणेचा उपयोग होणार आहे. आषाढी वारी, गणेशोत्सवामध्ये या सिग्नल्सचा वापर प्रभावी ठरेल, अशी माहिती वाहतूक उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली.
शहरातील मुख्य रस्ते आणि त्यावरील चौकांमध्ये सिग्नल व्यवस्था आहे; मात्र छोट्या अरुंद रस्त्यांवर, चौकांमध्ये सिग्नल व्यवस्था नसते. गर्दीच्या वेळी वेड्यावाकड्या पद्धतीने; तसेच पुढे जाण्याच्या घाईत वाहनचालक वाहने कशीही दामटवतात. त्यामुळे वाहतूककोंडी होते. त्याचा परिणाम अन्य
रस्त्यांवर होतो.
यासोबतच
शहरामध्ये सध्या विद्युतवाहिन्या, सीएनजी गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदाईची कामे सुरू आहेत. पीएमपी बस बंद पडल्यामुळे, तर कधी मिरवणुका, मोर्चा आणि आंदोलनांमुळे रस्त्यावर
वाहतूककोंडी होते.
अशा वेळी वाहतूक पोलिसांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. अशी स्थिती हाताळणे एकट्या पोलिसाच्या आवाक्याबाहेरचे असते. अशा वेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येण्याजोगे ‘पोर्टेबल सिग्नल्स’ वापरण्यात येणार आहेत.

Web Title: Portable Signals on Transporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.