पॉस्को गुन्ह्यातील आरोपी कोर्टातून फरार

By admin | Published: August 30, 2016 07:58 PM2016-08-30T19:58:40+5:302016-08-30T20:02:14+5:30

पॉस्को प्रकरणातील एक आरोपी दिंडोशी कोर्टातून फरार झाला. हा प्रकार मंगळवारी दुपारी घडला असुन याप्रकरणी कुरार पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

POSCO accused absconding from court | पॉस्को गुन्ह्यातील आरोपी कोर्टातून फरार

पॉस्को गुन्ह्यातील आरोपी कोर्टातून फरार

Next
ऑनलाइन लोकमत
 
मुंबई, दि.30 - पॉस्को प्रकरणातील एक आरोपी दिंडोशी कोर्टातून फरार झाला. हा प्रकार मंगळवारी दुपारी घडला असुन याप्रकरणी कुरार पोलीस अधिक चौकशी करत आहेत. 
मोहम्मद रईस मोहम्मद शरीफ शेख (२१) असे या फरार आरोपीचे नाव आहे. ज्याला एका लहान मुलीच्या विनयभंगप्रकरणी पॉस्को कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओशिवरा पोलिसांनी शेखला मंगळवारी दुपारी आर्थर रोड कारागृहात आणले होते. दिंडोशी कोर्टाच्या सहाव्या मजल्यावर असलेल्या कोर्ट रूममध्ये त्याला हजर करण्यात आले. त्यावेळी ओशीवराचे पोलीस कॉन्सटेबल प्रदीप सुर्वेकर आणि त्यांचे सहकारी गायकवाड हे त्याला घेऊन शिडीवरुन खाली उतरत होते. त्यावेळी शेखने त्यांच्या हाताला जोरात झटका दिला आणि पळू लागला.  त्यावेळी सुर्वेकर आणि गायकवाड त्याचा पाठलाग करत त्याच्या मागे धावले. मात्र कोर्टातील गर्दीचा फायदा घेत तो पसार झाला. त्यानुसार याबाबत लगेचच पोलीस नियंत्रण कक्षावर कळवत सर्वत्र नाकाबंदी लावण्यात आली. याप्रकरणी कुरार पोलिसांनी घटनेची नोंद केली असल्याचे कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लिंबन्ना व्हनमाने यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले.  मात्र अधिक माहिती देण्यास नकार दिला. शेख हा गोरेगाव पश्चिमच्या भगतसिंगनगरचा रहिवासी असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 
 
वकिलाने केले अलर्ट !
कोर्टातून शेख फरार झाल्याचे दिंडोशीजवळील एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या वकिलाने पाहिले. चेहरा ओळखीचा वाटल्याने त्याने याप्रकरणातील वकिलांना फोन करून या आरोपीला जामिन झाला का असे विचारले. तेव्हा त्याला पोलीस कोठडी झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार त्यांनी लगेचच संतोषनगर परिसरातून आरोपी फरार झाल्याचे पोलिसांना कळविले.

 

Web Title: POSCO accused absconding from court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.