दानवेंच्या नावे करोडो रुपये उकळणारा पोलिसांच्या ताब्यात

By Admin | Published: May 19, 2017 06:27 PM2017-05-19T18:27:57+5:302017-05-19T18:27:57+5:30

भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा पीए असल्याचं सांगून अनेकांना कोट्यवधींचा चुना लावणा-याला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली

In the possession of a demon of boiling millions of demons in the hands of the police | दानवेंच्या नावे करोडो रुपये उकळणारा पोलिसांच्या ताब्यात

दानवेंच्या नावे करोडो रुपये उकळणारा पोलिसांच्या ताब्यात

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 19- भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा पीए असल्याचं सांगून अनेकांना कोट्यवधींचा चुना लावणा-याला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे. गणेश बोरसे असं या इसमाचं नाव आहे. रावसाहेब दानवे यांना या प्रकराणाची कुणकुण लागली, त्यामुळे दानवेंनीच सापळा रचून त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

या माणसाने फक्त पैसैच वसूल केले नाहीत, तर मुख्यमंत्र्यांच्या नावानं बनावट ऑर्डर काढून लोकांना वितरीतसुद्धा केली आहे. कुणाची बदली करून देणे, अडकलेले सरकारी काम करून देणे, सरकारी नियुक्ती करून देणे, असली कामे करून देतो असल्याचं सांगून गणेश बोरसे लोकांकडून पैसै घेत होता. अगदी अनेक वरिष्ठ सरकारी अधिका-यांकडून सुद्धा त्यानं लाखोंची माया जमा केली. तर अनेकांकडून काम करून देण्याच्या नावाखाली कोट्यवधी जमवल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत त्याचे अजूनही काही साथीदार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवती आहे. उद्यापर्यंत या सगळ्या प्रकरणाचा उलगडा करणार असल्याचं औरंगाबाद पोलिसांनी सांगितले आहे. त्याच्या चौकशीतून अनेकांची नाव पुढं येण्याची शक्यता आहे.

Web Title: In the possession of a demon of boiling millions of demons in the hands of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.