‘एसीआरबाबत’ची चालढकल महागात पडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2017 05:26 AM2017-04-06T05:26:08+5:302017-04-06T05:26:08+5:30

अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वार्षिक गोपनीय अहवालाचे (एसीआर) कामे प्रलंबित ठेवणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसाठी एक धोक्याची सूचना आहे.

The possibility of 'ACR' related to the downfall of the cost | ‘एसीआरबाबत’ची चालढकल महागात पडण्याची शक्यता

‘एसीआरबाबत’ची चालढकल महागात पडण्याची शक्यता

Next

जमीर काझी,
मुंबई- आपल्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वार्षिक गोपनीय अहवालाचे (एसीआर) कामे प्रलंबित ठेवणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसाठी एक धोक्याची सूचना आहे. एसीआरबाबतचे काम ३० एप्रिलपर्यंत १०० टक्के पूर्ण न केल्यास, त्यांना यंदाच्या वार्षिक वेतनवाढीवर गंडातर येणार आहे.
पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी त्याबाबत सर्व पोलीस आयुक्त, अधीक्षक व घटकप्रमुखांना सूचना दिल्या आहेत. ‘एसीआर’च्या कार्यपूर्ती केल्याबाबतचा अहवाल प्रत्येक घटकाने निर्धारित मुदतीमध्ये पोलीस मुख्यालयाला पाठवायाचा आहे. अन्य शासकीय विभागाप्रमाणे पोलीस दलातही कॉन्स्टेबलपासून ते महासंचालक दर्जापर्यंतच्या अधिकाऱ्यासाठी ‘एसीआर’ महत्त्वाचा ठरतो. पदोन्नती, सेवा पदकासाठी, तसेच महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्ती करताना, त्यांच्या ‘सर्व्हिस बुका’तील शेरा अत्यंत महत्त्वपूर्ण समजला जातो. त्यामुळे प्रत्येक अधिकारी, कर्मचारी एसीआरबाबत दक्ष असतात. तथापि, अनेक वरिष्ठ अधिकारी कनिष्ठांचे गोपनीय अहवाल लिहिण्याच्या कामाकडे वेळेचे कारण सांगत, दुर्लक्ष करतात. पोलीस अंमलदार, अधिकाऱ्यांच्या याबाबतच्या व्यथा लक्षात आल्याने, पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी त्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने घालून दिलेल्या निर्देशांची पूर्णपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, प्रत्येक अंमलदार, अधिकाऱ्यांचे एसीआर लिहिण्याचे काम (प्रतिवेदन) १५ एप्रिलपर्यंत पूर्ण होणे गरजेचे आहे. त्याबाबत त्याहून वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पुनर्विलोकनासाठी अहवाल पाठवणे आवश्यक असते. त्यांच्याकडून हे काम ३० एप्रिलपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करून संस्करण अधिकाऱ्यांकडे पाठवणे निकडीचे आहे. या कामात दिरंगाई करणाऱ्यांना १ जुलैपासून वार्षिक वेतनवाढ रोखली जाणार आहे. त्याबाबत कोणत्याही परिस्थितीत व त्यामुळे या वर्षापासून एसीआर वेळेत पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.
>संबंधितांची वार्षिक वेतनवाढ रोखणार
प्रत्येक अंंमलदार, अधिकाऱ्यांसाठी एसीआर वेळेत पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. वरिष्ठांकडून त्याबाबतचे काम प्रलंबित राहिल्याने, त्यांना अनेक संधी गमवाव्या लागतात. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत एसीआरचे काम १०० टक्के पूर्ण न केल्यास संबंधितांची वार्षिक वेतनवाढ रोखली जाईल.
- सतीश माथुर,
पोलीस महासंचालक

Web Title: The possibility of 'ACR' related to the downfall of the cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.