एल निनो सक्रिय झाल्याने मान्सूनवर विपरित परिणामाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 03:37 PM2019-03-28T15:37:30+5:302019-03-28T15:38:42+5:30
जेव्हा समुद्राचे तापमान सरासरीपेक्षा अर्ध्या अंशाने वाढते़ तेव्हा सौम्य एल निनो निर्माण झाला असे म्हटले जाते़.
पुणे : प्रशांत महासागरातील एल निनो हा पुन्हा एकदा सक्रिय झाला असून तेथील पाण्याचे तापमान वाढत आहे़. त्याचा परिणाम आगामी मान्सूनवर होण्याची शक्यता असून यंदा मान्सून कमी बरसण्याची शक्यता असल्या अंदाज अमेरिकन हवामान विभागाने व्यक्त केला आहे़.
गेल्या वर्षी भारतीय हवामान खात्यात मान्सून सरासरीच्या ९७ टक्के होईल, असा अंदाज व्यक्त केला होता़. प्रत्यक्षात तो ९१ टक्के झाला असून आवर्षण प्रवण भागात तसेच मध्य भारतात त्यामुळे दुष्काळ पडला आहे़ .
याबाबत ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ़. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, ज्या ज्यावेळी एल निनो सक्रिय होतो़. त्यावेळी दीर्घकालीन काळात मान्सूनवर परिणाम झालेला दिसून आला आहे़. भारतीय हवामान विभाग ज्या मॉडेलच्या आधारे मान्सूनचा अंदाज व्यक्त करत असते़ त्यातील सहा प्रमुख घटकांपैकी एल निनोची स्थिती हा एक महत्वाचा घटक आहे़. याशिवाय अन्य घटकांची स्थिती कशी आहे़. यावरही मॉन्सून किती बरसणार हे पाहणे महत्वाचे असते़ एल निनो सक्रिय असलेली २५ वर्षे पाहिली असता त्यात जास्त वेळा मान्सून कमी झाल्याचे पाहायला मिळते़. त्यामुळे एल निनो सक्रीय असेल तर मॉन्सूनवर विपरित परिणाम होणार असल्याचे संकेत मिळतात़ त्याचवेळी काही वर्षी एल निनो सक्रिय असतानाही चांगला मॉन्सून झाला आहे़. एल निनोशिवाय अन्य घटक हिंदी महासागरातील पाण्याचे तापमान अनुकुल असेल तर तो घटक अधिक प्रभावी ठरुन मान्सून चांगला झालेला पहायला मिळालेला आहे़. त्यामुळे अन्य घटक किती प्रभावी आहेत़ याचा अभ्यास केल्यानंतरच मॉन्सून किती होईल याचा अंदाज व्यक्त करणे शक्य होणार आहे़.
भारतीय हवामान विभागाच्या पुढाकाराने आशियाई देशातील शास्त्रज्ञांनाची परिषद एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होईल़. त्यात आतापर्यंत घेतलेल्या निरीक्षणाचा अभ्यास करुन आगामी मान्सून कसा असेल, याचा अंदाज जाहीर केला जातो़.
़़़़़़़
काय आहे एल निनो
दक्षिण अमेरिकेत पेरु देश आहे़. त्याच्या किनाऱ्याच्या पश्चिमेकडे जो प्रशांत महासागर आहे़. त्याचे तापमान सरासरीपेक्षा वाढते़. ही तापमान वाढ हळूहळू प्रशांत महासागराच्या बऱ्याच मोठ्या भागावर पसरते़ . जेव्हा समुद्राचे तापमान सरासरीपेक्षा अर्ध्या अंशाने वाढते़ तेव्हा सौम्य एल निनो निर्माण झाला असे म्हटले जाते़. तापमान वाढ दोन अंशाहून जास्त झाली तर त्याला अतितीव्र एल-निनो म्हणतात. मध्यंतरीच्या एल-निनोच्या अवस्थेतला मध्यम किंवा तीव्र गणले जाते. एल-निनो प्रबळ होतो. तो वर्षाअखेरीस, किंवा ख्रिसमसच्या सुमारास, त्यावरुन त्याला एल निनो हे नाव पडले आहे़. पण त्याच्या बऱ्याच आधी म्हणजे मे-जून महिन्यात त्याचे वेध लागतात. त्याच सुमारास भारतावर मान्सून येतो. म्हणून एल-निनोचा प्रभाव मान्सूनवर पडू शकतो. भारतीय हवामान विभागामार्फत मान्सूनच्या अंदाजासाठी जे प्रमुख ६ घटक गृहीत धरले जातात़. त्यातील एल निनो हा एक प्रमुख घटक आहे.