सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांच्या चौकशीची शक्यता
By admin | Published: June 4, 2017 06:54 PM2017-06-04T18:54:22+5:302017-06-04T18:54:22+5:30
राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहे. सिंचन घोटाळ्याप्रकरणी इडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कागदपत्रे मागवली असून, आता या प्रकरणात अजित पवार यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आघाडी सरकारच्या काळात गाजलेल्या सिंचन घोटाळ्या प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केली होती. या प्रकरणात राष्ट्रवादीचे अजून एक ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांचीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी झाली होता. या संदर्भातील वृत्त काही मराठी वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.
त्यामुळे आता अजित पवार यांची चौकशी झाल्यास पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे. या प्रकरणात याआधी लाचलुचपत प्रतिंधक विभागाने 2015 साली ऑक्टोबर महिन्यात अजित पवार यांना तीन वेळा समन्स बजावला होता. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पवारांची तीन तास चौकशी केली होती.