नागपुरात भाजपाला एकहाती सत्ता मिळण्याची शक्यता - एक्झिट पोल
By Admin | Published: February 21, 2017 08:15 PM2017-02-21T20:15:58+5:302017-02-21T20:19:28+5:30
राज्यातील दहा महापालिकांसाठी मोठ्या उत्साहात मतदान झालं आहे. अनेक उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं असलं तरी आता निकालाचा उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीसाठी मोठ्या उत्साहात मंगळवारी मतदान पार पडले. अनेक उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं असलं तरी आता या निवडणुकींच्या निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, अॅक्सिस– माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, नागपूर महापालिकेत भाजपाला एकहाती सत्ता मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अॅक्सिस– माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, नागपूर महापालिकेत 151 जागांपैकी भाजपाला 98 ते 110 जागा मिळतील असे भाकित वर्तविण्यात आले आहे. त्यामुळे नागपुरात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळण्याचे संकेत आहेत. तर, काँग्रेसला 35 ते 41 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच, या पालिकेच्या निवडणुकीत स्वतंत्र लढलेल्या शिवसेनेला अवघ्या 2 ते 4 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला आहे.
दरम्यान, या पोलनुसार नागपूरात भाजपाला बहुमत मिळाले आणि जास्त जागा मिळाल्या, तर भाजपाला एकहाती सत्ता मिळेल.