मुस्लिम मतांमध्ये विभाजनाची शक्यता
By admin | Published: February 18, 2017 05:04 PM2017-02-18T17:04:20+5:302017-02-18T17:04:20+5:30
मुस्लिम मतांमध्ये विभाजनाची शक्यता
मुस्लिम मतांमध्ये विभाजनाची शक्यता
अमरावती : महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराचा वेग वाढला आहे. मात्र महापालिका निवडणुकीच्या रणागणांत पहिल्यांदाच उडी घेतलेल्या एमआयएम पक्षामुळे मुस्लिम मतांमध्ये विभाजन होणार आहे. याचा फटका मुस्लिम बहुल भागातील उमेदवारांना बसणार असून काँग्रेस, राष्ट्रवादी, मुस्लिम लिग, व समाजवादी पार्टीसाठी नुकसानदायक ठरणारे आहे.
मुस्लिम पक्षाच्या बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरी गेट, छायानगर, ताजनगर, लालखडी, आझाद कॉलनी, अंसारनगर, महेंदिया कॉलनी, वलगाव मार्ग, वाहेद कॉलनी, गुलिस्तानगर, जमिल कॉलनी, नूरनगर, रहेमतनगर, अलिमनगर, हैदरपुरा, ताजनगर, पाटीपुरा, आझाद कॉलनी, कमेला ग्राऊंड, पठाणपुरा, चपराशीपुरा आदी ठिकाणी मुस्लिम समाजाचे तारणहार म्हणून मिरविणाऱ्या तथाकथित नेत्यांनी धर्मनिरपेक्ष पक्षांमध्ये जोरदार लढत आहे. एमआयएम पक्षाने यावेळी महापालिका निवडणुकीत १८ उमेदवार रिंगणात उभे केले आहे. एमआयएम पक्षनेत्यांच्या आक्रमक भाषणाने मुस्लिम मतांचे धु्रवीकरण अटक मानले जात आहे. एमआयएमच्या आक्रमकतेने विकास कामे, सर्वसमावेशक अशी झुल पांघरलेल्या समाजवादी पार्टीने देखील आक्रमकता स्वीकारली आहे. एमआयएम पक्षाकडे मुस्लिम समाजातील युवकांचा कल आहे. मुस्लिम मतांच्या धु्वीकरणाचा फटका सत्ता स्थापनेच्यावेळी काँग्रेसला बसण्याचे संकेत आहे.
बडनेऱ्यातही मुस्लिम मतदारांचा प्रभाव
४बडनेरा जुनिवस्तीत एमआयएम पक्षाचे चार उमेदवार रिंगणात आहेत. मुस्लिमबहुल भागात एमआयएमचा प्रभाव अधिक जाणवत आहे. एमआयएमने काँग्रेस, बसपा, राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेनेला तगडे आव्हान उभे केले आहे. मुस्लिम समाजाच्या गठ्ठा मतांवर विजयाचे समीकरण एमआयएम जुळवीत आहे. चारपैकी दोन जागांवर विजय कसा खेचून आणता येईल, यावर एमआयएम नेत्यांचा भर आहे. तर अन्य पक्षाने किमान तीन जागेवर विजय मिळावा, यासाठी मोर्चेबांधणी चालविली आहे.