ठाण्यात शिवसेना स्वबळावर सत्ता स्थापण्याची शक्यता - एक्झिट पोल
By Admin | Published: February 21, 2017 07:18 PM2017-02-21T19:18:17+5:302017-02-21T19:35:58+5:30
अॅक्सिस - माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार ठाण्यातील महानगरपालिकेत शिवसेना स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - राज्यातील 10 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान झालं आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, अॅक्सिस - माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार ठाण्यातील महानगरपालिकेत शिवसेना स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अॅक्सिस - माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला 62 ते 70 जागा मिळतील अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर भाजपाला 26 ते 33 जागा मिळतील असा अंदाज आहे. त्याचबरोबर कॉंग्रेसला अवघ्या 2 ते 6 जागा मिळतील. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला 29 ते 34 जागांवर समाधान मानावे लागेल, असे हा पोल सांगतो.
दरम्यान, या पोलनुसार शिवसेना पुन्हा एकदा ठाण्यातील सत्ता आबाधीत राखण्याची शक्यता आहे.