मराठवाड्यात गारांच्या पावसाची शक्यता
By admin | Published: May 11, 2016 04:04 AM2016-05-11T04:04:15+5:302016-05-11T04:04:15+5:30
राज्याच्या काही भागांमध्ये गेल्या २४ तासांत वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. पुणे, वाशिम आदी जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याला चांगलाच जोर होता
पुणे : राज्याच्या काही भागांमध्ये गेल्या २४ तासांत वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. पुणे, वाशिम आदी जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याला चांगलाच जोर होता. येत्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
मंगळवारी मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला. मान्सून येण्यास अजून काही दिवस बाकी आहेत. मात्र वळवाच्या पावसाने राज्यात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यापासून राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळे तापलेला महाराष्ट्र गार होऊ लागला आहे. राज्यात मंगळवारी सर्वाधिक ४१.३ अंश सेल्सिअस तापमान ब्रह्मपुरीमध्ये नोंदविले गेले. बहुतांश शहरांचे कमाल तापमान ४० अंशाच्या आत आले होते. (प्रतिनिधी)