राज्यात पुन्हा पावसाची शक्यता
By admin | Published: May 4, 2015 01:38 AM2015-05-04T01:38:20+5:302015-05-04T01:38:20+5:30
राज्यात अवकाळी पावसाचे सत्र अजूनही सुरूच आहे. पुढील आठवडाभर राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
पुणे : राज्यात अवकाळी पावसाचे सत्र अजूनही सुरूच आहे. पुढील आठवडाभर राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
मे महिन्याच्या सुरूवातीलाच पुन्हा पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. सोमवारी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस विदर्भासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागात पाऊस पडू शकतो. पुण्यात बुधवार, गुरुवार व शुक्रवार असे तीन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे. इतर दिवशी आकाश अंशत: ढगाळ राहील.
राज्यात कमाल तापमान स्थिर असल्याने उकाडा कायम आहे. रविवारी राज्यात चंद्रपूर येथे सर्वाधिक ४५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात सर्वच भागाचे कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदविले गेले. मराठवाड्यातही कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाची तीव्रता जाणवत आहे. मध्य महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा चढाच राहिला आहे. (प्रतिनिधी)