मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 11:53 AM2019-02-08T11:53:52+5:302019-02-08T12:00:11+5:30
मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे़
पुणे : मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली़ तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पुन्हा तापमानात घट झाली असून सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे़.११ फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. कोकण, गोवा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे ९़.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़.
पुढील आठवड्यात विदर्भात किमान तापमान हे सरासरीच्या तुलनेत घटलेले राहणार आहे़. उत्तर भारतात अनेक ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे़.
मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे़. ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़.
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे १०़़.५, लोहगाव १३़.२, अहमदनगर ९़.९, जळगाव १५, कोल्हापूर १७़.३, महाबळेश्वर १०़.६, मालेगाव १४़.२, नाशिक १३़.२, सांगली १५़.३, सातारा ११़.८़, सोलापूर २०़.४, मुंबई २०़.५, सांताक्रूझ १७़.६, अलिबाग १८, रत्नागिरी १७़.९, पणजी २०, डहाणु १६़.७, औरंगाबाद १५़.६, परभणी १९, नांदेड १९, बीड १४़.८, अकोला १८़.५, अमरावती १९़.४, बुलढाणा १७, ब्रम्हपूरी १५़.४, चंद्रपूर १५़.२, गोंदिया १६़.६, नागपूर १७़.१, वाशिम १६़.४, वर्धा २०, यवतमाळ २०़
\\\\\\\\\\\\\
पुण्यात पुन्हा थंडी
पुणे शहरातील तापमानात गेल्या दोन दिवसात वाढ झाली होती़. त्यामुळे दिवसा उकाडा लावून लागला होता़ ५ फेबुवारीला पुण्यात कमाल व किमान तापमान ३२़.६ व १३़.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले होते़. तसेच ६ फेब्रुवारीला अनुक्रमे ३२़.४ व १३़.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते़. यामुळे बुधवारी दिवसाबरोबरच रात्रीही काहीसा उकाडा जाणवू लागला होता़. असे असतानाच गुरुवारी सकाळी किमान तापमानात पुन्हा घट झाली असून ते १०़.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़. त्याचबरोबर कमाल तापमान २७़.३ अंशापर्यंत खाली आले आहे़. ते सरासरीपेक्षा ३़.९ अंशाने कमी होते़ . त्यामुळे सायंकाळची थंडी जाणवू लागली आहे़. पुढील दोन दिवसात किमान तापमान आणखी कमी होऊन ते ९ ते ८ अंश सेल्सिअसपर्यंत घटण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़.