राज्यात पावसाची शक्यता
By admin | Published: May 29, 2016 12:41 AM2016-05-29T00:41:32+5:302016-05-29T00:41:32+5:30
विदर्भ वगळता राज्याच्या तापमानात झालेली घट शनिवारीही कायम होती. विदर्भात मात्र उष्णतेची लाट कायम आहे. नागपूरमध्ये सर्वाधिक ४४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
पुणे : विदर्भ वगळता राज्याच्या तापमानात झालेली घट शनिवारीही कायम होती. विदर्भात मात्र उष्णतेची लाट कायम आहे. नागपूरमध्ये सर्वाधिक ४४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील ४८ तासात राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली.
शनिवारी विदर्भाचेच तापमान चढे होते. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे तापमान घटले होते. बहुतांशी शहरांचे तापमान चाळीस अंशाच्या खाली आले आहे. पुढील दोन दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहणार आहे. (प्रतिनिधी)
मॉन्सून जैसे - थे
अंदमान-निकोबार बेटांवर दहा दिवसांपूर्वी दाखल झालेल्या मॉन्सूनला आगेकूच करण्यासाठी अजूनही अनुकुल स्थिती निर्माण झालेली नाही. पॅसिफिक महासागरामध्ये निर्माण झालेली हवेची चक्राकार स्थिती मॉन्सूनचे वारे अजूनही ओढत आहे. त्यामुळे अंदामन-निकोबार बेटांच्या पुढे जाण्यासाठी मॉन्सूनला अनुकुल स्थितीच निर्माण होत नसल्याचे चित्र आहे. पुढील २ ते ३ दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.