राज्यात पावसाची शक्यता
By admin | Published: May 31, 2016 06:30 AM2016-05-31T06:30:23+5:302016-05-31T06:30:23+5:30
अंदमानच्या समुद्रात गेल्या १८ मे रोजी आलेल्या मॉन्सूनने २० मेपर्यंत उर्वरित भागात वाटचाल केली पण, त्यानंतर त्याचा मुक्काम अद्याप तेथेच असून १० दिवसांत त्याची पुढे वाटचाल झालेली नाही़
पुणे : अंदमानच्या समुद्रात गेल्या १८ मे रोजी आलेल्या मॉन्सूनने २० मेपर्यंत उर्वरित भागात वाटचाल केली पण, त्यानंतर त्याचा मुक्काम अद्याप तेथेच असून १० दिवसांत त्याची पुढे वाटचाल झालेली नाही़ मात्र, पुढील तीन दिवसांत संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली.
गेल्या २४ तासांत राज्यात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला़ पूर्व मध्य प्रदेशातील
काही ठिकाणी, पश्चिम मध्य
प्रदेश, छत्तीसगड येथील तुरळक ठिकाणी पाऊस झाला़ कर्नाटक किनारपट्टी, गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक परिसरात
तुरळक ठिकाणी पाऊस
झाला़ दरम्यान, विदर्भातील
पारा अजूनही ४०च्या पुढेच आहे. राज्यात वर्धा येथे सर्वाधिक कमाल तापमान ४३़५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले़ (प्रतिनिधी)