तापी नदीला महापूर येण्याची शक्यता, १३ गावात अतिदक्षतेचा इशारा
By admin | Published: July 6, 2016 08:52 PM2016-07-06T20:52:12+5:302016-07-06T20:52:12+5:30
तापी नदीच्या उगमक्षेत्र असलेल्या मध्य प्रदेशातील बैतुल येथे २०० मि मी. पाऊस झाल्याने आज रात्री उशिरा तथा उद्या पहाटे तापी नदीला महापूर येण्याची शक्यता आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
रावेर, दि. ६ - तापी नदीच्या उगमक्षेत्र असलेल्या मध्य प्रदेशातील बैतुल येथे २०० मि मी. पाऊस झाल्याने आज रात्री उशिरा तथा उद्या पहाटे तापी नदीला महापूर येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभुमीवर रावेर तालुक्यातील तापीकाठच्या १३ गावात दवंडी पिटवून संबंधित नागरीक, पोलीस पाटील, तलाठी, महावितरणविभागाला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. हतनुर धरणाचे ३६ दरवाजे उघडण्यात आली आहेत. तापी नदीपात्र आतापर्यंत कोरडे असल्याने रावेर तहसीलदार कुंदन हिरे यांनी हा सावधानतेचा इशारा दिला आहे.