कोकणातील गणेशभक्तांना टोलमाफीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 08:37 PM2017-08-01T20:37:00+5:302017-08-01T20:46:40+5:30

कोकणात गणेशोत्सवाकरिता जाणाऱ्या गणेशभक्तांच्या खासगी वाहनांच्या रांगा टोलनाक्यावर लागून वाहतूक खोळंबा होऊ नये याकरिता गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही गणेशभक्तांना टोलमाफी  मिळण्याची शक्यता

The possibility of tollify to the devotees of Konkan | कोकणातील गणेशभक्तांना टोलमाफीची शक्यता

कोकणातील गणेशभक्तांना टोलमाफीची शक्यता

googlenewsNext
ठळक मुद्देउद्या बैठकीत होणार निर्णयटोलमाफी देण्याचा प्रयत्न करु - चंद्रकांत पाटीलमध्य आणि कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या एसटी महामंडळाकडून जादा बसेस

मुंबई, दि. 01 - कोकणात गणेशोत्सवाकरिता जाणाऱ्या गणेशभक्तांच्या खासगी वाहनांच्या रांगा टोलनाक्यावर लागून वाहतूक खोळंबा होऊ नये याकरिता गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही गणेशभक्तांना टोलमाफी  मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबईहून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी मिळावी, यासाठी उद्या बैठकही बोलावण्यात आली आहे. 

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत बोलताना सांगितले की, कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करण्यात येईल. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कोकणात जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

कोकणात गणेशोत्सवाकरिता मोठ्या प्रमाणात चाकरमानी जात असतात. गेल्या वर्षी कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट मिळावी यासाठी वाहतूक पोलीस स्टेशन आणि आरटीओ कार्यालयातून विशेष पास देण्यात आले होते. या पाससाठी चाकरमान्यांना त्यांचा सध्याचा निवासी पत्ता, कोकणातील गावचा पत्ता, वाहन क्रमांक आणि मोबाइल क्रमांक आदी तपशील द्यावा लागला होता. 

याचबरोबर गणेशोत्सवासाठी कोकणात एसटी महामंडळाकडून जादा बसेस सोडण्यात येतात. तर, मुंबईहून मध्य आणि कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या सोडल्या जातात. 

Web Title: The possibility of tollify to the devotees of Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.