विमानात घातपाती कारवायांची शक्यता
By Admin | Published: October 9, 2016 02:20 AM2016-10-09T02:20:40+5:302016-10-09T02:20:40+5:30
पाककडून घातपाती कारवायांची शक्यता असल्याने केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी केला असताना मुंबई विमातळावरून उड्डाण घेणाऱ्या विमानात घातपाती
मुंबई : पाककडून घातपाती कारवायांची शक्यता असल्याने केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी केला असताना मुंबई विमातळावरून उड्डाण घेणाऱ्या विमानात घातपाती कारवाया करण्याचे संभाषण एका तरुणाने ऐकल्याने मुंबईसह सर्वच विमानतळ यंत्रणांना हाय अलर्ट देण्यात आल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी मुंबईसह सर्व गुप्तचर यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. , मुंबईच्या मरिन ड्राइव्ह परिसरात गुरुवारी रात्री २ वाजता फिरत असताना ५ ते ६ तरुण मुंबई विमानतळावरून रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी उड्डाण घेणाऱ्या इंडिगो विमानात भीतीदायक वातावरण निर्माण करू अशी गुप्त चर्चा करताना, त्यांचे संभाषण एका तरुणाने ऐकले. त्याने चेन्नई नियंत्रण कक्षाला मोबाइलवरून फोन करून याची माहिती दिली. चेन्नई गुप्तचर यंत्रणांनी याची दखल घेत मुंबई विमानतळ प्राधिकरणास याची माहिती दिली. त्यानुसार शुक्रवारी रात्री उड्डाण केलेल्या मुंबई ते कोलकाता या इंडिगो विमान क्र. ६ ई ६२५ ची तपासणी करण्यात आली. तसेच सर्व विमानतळ प्राधिकरणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)