नववर्षासाठी गोव्याला जाणा-या प्रवाशांची संभाव्य गर्दी, कोकण रेल्वेवर १६ फे-या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 03:18 AM2017-12-21T03:18:42+5:302017-12-21T03:19:03+5:30
नववर्षासाठी गोव्याला जाणा-या प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेता या मार्गावर १६ विशेष फे-या चालवण्यात येणार आहेत. मध्य आणि कोकण रेल्वेने एकत्र येत तीन एक्स्प्रेसच्या मदतीने या १६ फे-या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही एक्स्प्रेसमध्ये २ टायर वातानुकूलित श्रेणीची १ बोगी, ३ टायर वातानुकूलित ५ बोगी आणि ६ शयनयान बोगी असणार आहेत.
मुंबई : नववर्षासाठी गोव्याला जाणा-या प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेता या मार्गावर १६ विशेष फे-या चालवण्यात येणार आहेत. मध्य आणि कोकण रेल्वेने एकत्र येत तीन एक्स्प्रेसच्या मदतीने या १६ फे-या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही एक्स्प्रेसमध्ये २ टायर वातानुकूलित श्रेणीची १ बोगी, ३ टायर वातानुकूलित ५ बोगी आणि ६ शयनयान बोगी असणार आहेत.
मुंबई-करमाळी-मुंबई विशेष सुपरफास्ट (४ फे-या) ट्रेन क्रमांक ०२०२५ ही विशेष सुपरफास्ट एक्स्प्रेस २१ आणि २८ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल. ०२०२६ ही सूपरफास्ट एक्स्प्रेस करमाळी येथून २१ आणि २८ डिसेंबर रोजी करमाळी येथून दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. तर मुंबई-करमाळी-करमाळी विशेष (८ फेºया ) ट्रेन क्रमांक ०२०२७ ही ट्रेन २३, २४, ३० आणि ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल. ०२०२८ ही ट्रेन २३, २४, ३० आणि ३१ डिसेंबर रोजी करमाळी येथून दुपारी २ वाजता निघेल.
मुंबई-करमाळी-मुंबई एक्स्प्रेस (४ फे-या) ०२०२९ ही ट्रेन २५ डिसेंबर २०१७ आणि १ जानेवारी २०१८ रोजी सीएसएमटी येथून रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी निघेल. तर करमाळी येथून याच दिवशी दुपारी २ वाजता सुटेल.