पदव्युत्तर "सीईटी" ऑनलाइन नोंदणीस मुदतवाढ

By Admin | Published: July 3, 2017 10:49 PM2017-07-03T22:49:00+5:302017-07-03T22:49:00+5:30

मराठवाडा विद्यापीठ पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयात सुरू असलेल्या ऑनलाइन नोंदणीस एक दिवसाची मुदतवाढ दिली

Post graduate "CET" online registration expires | पदव्युत्तर "सीईटी" ऑनलाइन नोंदणीस मुदतवाढ

पदव्युत्तर "सीईटी" ऑनलाइन नोंदणीस मुदतवाढ

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 3 - डॉ .बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयात सुरू असलेल्या ऑनलाइन नोंदणीस एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे. नोंदणी करताना आज विद्यार्थ्याना अडथळे आल्यामुळे ४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजपर्यंत ऑनलाइन करण्यास कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी मुदतवाढ दिली आहे.

विद्यापीठातील पदव्यूत्तर विभाग तसेच विद्यापीठाचा उस्मानाबाद कॅम्पस व संलग्नित १२७ महाविद्यालयातील पदव्यूत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश हे केंद्रिय प्रवेश पूर्व परीक्षा अर्थात सीईटीच्या माध्यमातूनच होणार आहेत. प्रवेश प्रक्रियेला १२ जूनपासून सूरुवात झाली असून १० जुलै रोजी सीईटी घेण्यात येणार आहे. विद्यापीठ कॅम्पसमधील ५५ विषय, उस्मानाबाद कॅम्पसमधील पाच विषयासाठी तसेच विद्यापीठाशी संलग्नित औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद जिल्हयात १२७ पदव्यूत्तर महाविद्यालयात सीईटी" घेण्यात येईल. महाविद्यालयात पदव्युत्तरच्या ७० विषयासाठी ही सीईटी देणे बंधनकारक असणार आहे.

प्रवेश पूर्व परीक्षेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे - ऑनलाईन अर्ज दाखल करणे (१२ जून ते ४ जुलै), हॉलतिकीट मिळविणे (४ ते ६ जुलै), प्रवेश पूर्व परीक्षा (१० जुलै), निकाल (१५ जुलै), नोंदणी व ऑप्शन फॉर्म भरणे तसेच कागदपत्रांची तपासणी (१५ ते २५ जुलै), सर्वसाधारण यादी (३० जुलै), प्रथम यादी (१ ऑगस्ट) , द्वितीय यादी (७ ऑगस्ट), स्पॉट अ‍ॅडमिशन (१० ऑगस्ट), प्रवेशित ठिकाणी उपस्थिती नोंदविणे (११ ते १४ ऑगस्ट) या प्रमाणे वेळापत्रक आखण्यात आले आहे. ज्या पदवी अभ्यासक्रमांचा अजून निकाल बाकी असून तेही विद्यार्थी ४ जुलैपर्यंत ऑनलाईन नोंदणी करू शकणार आहेत, अशी माहिती प्रभारी अधिकारी डॉ.सतीश पाटील यांनी दिली. विद्यापीठ व महाविद्यालयातील तासिकांना १६ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे,. या संबंधीची अधिक माहिती विद्यापीठाच्या bamu.ac.in  संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Web Title: Post graduate "CET" online registration expires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.