पदवी, पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलल्या
By Admin | Published: October 10, 2015 02:08 AM2015-10-10T02:08:46+5:302015-10-10T02:08:46+5:30
मुंबई विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय परीक्षा नियंत्रकांनी शुक्रवारी घेतला आहे. नवे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय परीक्षा नियंत्रकांनी शुक्रवारी घेतला आहे. नवे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. एमएच्या पहिल्या आणि तिसऱ्या सत्राचा समाजशास्त्रचा पेपर १६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर टीवायबीएचा रशियन च्या पाचव्या सत्राचा पेपर ३० आॅक्टोबरला होईल. एमएच्या राज्यशास्त्रच्या तिसऱ्या सत्राचा पेपर १६ नोव्हेंबरला, नागरी धोरणाच्या दुसऱ्या सत्राचा २ नोव्हेंबरचा पेपर २४ नोव्हेंबरला होईल. गणित व भूगोल ाचे या विषयांच्या पहिल्या सत्रांचे ३ नोव्हेंबरचे पेपर २६ नोव्हेंबरला होतील. टीवायबीकॉमच्या सहाव्या सत्राची परीक्षाही २९ नोव्हेंबरला होईल. (प्रतिनिधी)