अंदुरेच्या पोस्टमध्ये करुणानिधी, राहुल गांधींचा तिरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 02:37 AM2018-08-21T02:37:03+5:302018-08-21T02:37:31+5:30

फेसबुकवरील पोस्टमध्ये शरद पवारांविरुद्धही विखारी टीका

In the post of Indira, Karunanidhi and Rahul Gandhi hate it | अंदुरेच्या पोस्टमध्ये करुणानिधी, राहुल गांधींचा तिरस्कार

अंदुरेच्या पोस्टमध्ये करुणानिधी, राहुल गांधींचा तिरस्कार

Next

औरंगाबाद : दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने अटक केलेला सचिन अंदुरे हा फेसबुकवरील त्याच्या पोस्टमध्ये हिंदुत्वविरोधी नेत्यांचा द्वेष करणाऱ्या पोस्ट शेअर करायचा, हे समोर आले. त्याचे फेसबुक अकाऊंट दोन दिवसांपूर्वीच डिलिट करण्यात आले, हे मात्र विशेष.
८ आॅगस्टला त्याने टाकलेल्या पोस्टमध्ये तामिळनाडूचे दिवंगत माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या मृत्यूबद्दल त्याला कोणतीही करुणा नसल्याचे नमूद केले. भगवान रामाबद्दल आक्षेपार्ह विधान करणाºया करुणानिधी यांच्या स्मारकासाठी दोन एकर जागेसाठी समर्थकांना भांडावे लागत असल्याचे त्याने म्हटले आहे. सचिनने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध विखारी टीका करणाºया पोस्ट शेअर केल्या होत्या. त्याचे फेसबुक प्रोफाईलचे चित्र नृहसिंह हिरण्यकश्यपचे पोट फाडतानाचे चित्र होते. १४ आॅगस्टला त्याला मुंबई एटीएसने ताब्यात घेतले आणि त्याला मुंबईला नेले.

शरद कळसकरच्या अटकेनंतर नजरेत
दहशतवादविरोधी पथकाने औरंगाबाद जिल्ह्यातील शरद कळसकरला अटक केली. त्याच्या चौकशीत सचिन अंदुरेचे नाव एटीएसच्या समोर आले. एटीएसने त्याची कसून चौकशी करून सोडून दिल्यानंतर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) औरंगाबादेतून सचिनला उचलल्याचे समोर आले.
सूत्रांनी सांगितले की, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे चांगले मित्र होते. देवगिरी किल्ल्याच्या जंगलात सचिनने शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्याची चर्चा आहे. मात्र, याविषयी कोणतीही अधिकृत माहिती तपास यंत्रणा देत नाही. सचिन १९ आॅगस्ट २०१३ रोजी रात्री औरंगाबादेतून पुण्याला गेला आणि साथीदाराच्या मदतीने दाभोलकरांवर गोळ्या झाडून तो लगेच औरंगाबादला परतला असावा, अशी चर्चा शहरात सुरू आहे.

Web Title: In the post of Indira, Karunanidhi and Rahul Gandhi hate it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.