मरणोत्तर नेत्रदान करणार मुख्य कार्यकारी अधिकारी

By Admin | Published: March 9, 2015 09:22 PM2015-03-09T21:22:32+5:302015-03-09T23:54:28+5:30

विजयकुमार काळम : आतापर्यंत केले ३५ वेळा रक्तदान

Posthumous eye donation chief executive officer | मरणोत्तर नेत्रदान करणार मुख्य कार्यकारी अधिकारी

मरणोत्तर नेत्रदान करणार मुख्य कार्यकारी अधिकारी

googlenewsNext

रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम हे मरणोत्तर नेत्रदान करणार आहेत. आज (सोमवार) त्यांनी रक्तदान केले. आजपर्यंत त्यांनी ३५ वेळा रक्तदान केले असून, काळम यांनी यापुढेही रक्तदान करतच राहणार असल्याचा मानस व्यक्त केला.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत महिला आरोग्य अभियानानिमित्त आधार संघटना आणि जिल्हा परिषद कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मचारी, अधिकारी यांचे आज रक्तदान शिबिर लोकनेते शामराव पेजे सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी रक्तदान करून जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाला प्रोत्साहन दिले. शिबिरात अनेक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी रक्तदान केले.यावेळी महिला कर्मचाऱ्यांनीही रक्तदान करुन आपण कशातही मागे नसल्याचे दाखवून दिले. आज मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ३४ वेळा रक्तदान केले होते. आज त्यांनी ३५व्या वेळी रक्तदान केले. उद्घाटनानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी रक्तदानासह मरणोत्तर नेत्रदान करणार असल्याचे जाहीर केले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्याचवेळी त्यांनी मरणोत्तर नेत्रदानासाठी लागणारी कागदोपत्री प्रक्रियाही पूर्ण केली. दोन वर्षांपूर्वी पत्नी जयश्री यांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्यामुळेच आपणही नेत्रदान करण्यास प्रोत्साहीत झालो असून, आज आपली तीही इच्छा पूर्ण होत आहे. आपली पत्नीही मरणोत्तर नेत्रदान करणार असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी रक्तदान करावे, असे त्यांनी जाहीर केले. रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य महिला अभियानांतर्गत शिबीर घेण्यात आले. अशा अभियानामध्ये कर्मचारी अधिकारी यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र खंडागळे, माध्यम व प्रसिध्दी अधिकारी श्रीकांत कुलकर्णी, कर्मचारी नेते वामन कदम व अन्य उपस्थित होते. (शहर वार्ताहर)

जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या निर्धाराने समाधान.
पती-पत्नीच्या संकल्पाने नवा आदर्श सर्वांसमोर.
नेत्रदानासाठी पत्नीची प्रेरणा महत्त्वाची.
महिला आरोग्य अभियानांतर्गत झालेल्या रक्तदान शिबिरात सहभाग.
कर्मचारी-अधिकारी रक्तदान.

Web Title: Posthumous eye donation chief executive officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.