जलसंपदा विभागातील विशिष्ट अधिकाऱ्यांवर ‘पोस्टिंग’ची मेहरनजर
By अतुल कुलकर्णी | Published: October 11, 2018 01:00 AM2018-10-11T01:00:07+5:302018-10-11T01:00:37+5:30
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंशी शिष्टाई करण्यात पुढाकार घेणा-या जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या खात्यात सेवाज्येष्ठतेत पुढे असणा-यांना डावलून त्यांच्यापेक्षा कनिष्ठ अधिकाºयांवर मेहरनजर दाखवण्यात आली असून त्यांना महत्वाच्या जागी पोस्टींग मिळाली आहे.
मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंशी शिष्टाई करण्यात पुढाकार घेणा-या जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या खात्यात सेवाज्येष्ठतेत पुढे असणा-यांना डावलून त्यांच्यापेक्षा कनिष्ठ अधिकाºयांवर मेहरनजर दाखवण्यात आली असून त्यांना महत्वाच्या जागी पोस्टींग मिळाली आहे.
कार्यकारी संचालक पदासाठी पात्र असणाºया चार अधिकाºयांपैकी राजेंद्र पानसे व अविनाश सुर्वे या दोनच अधिकाºयांना कार्यकारी पदे मिळाली आहेत. अन्य दोन अधिकाºयांपैकी राजेंद्र पवार यांना गेल्या चार वर्षापासून साईड पोस्टींग दिली गेली आहे. राज्याच्या सेवाज्येष्ठता यादीत चौथ्या नंबरवर असणाºया ह. य. ढंगारे यांना तर तब्बल आठ महिन्यापासून कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. पुढच्या महिन्यात ते निवृत्त होत असल्याने आठ दिवसापूर्वी औरंगाबादच्या वाल्मीत रुजू करुन घेतले गेले. दुसरे अधिकारी सुर्वे यांचे विदर्भ कनेक्शन मजबूत असल्याने त्यांना मात्र मंत्रालयात सचिवपदही आणि विदर्भ पाटबंधारे महामंडळाचा अतिरिक्त कार्यभारही मिळाला आहे.
सगळ्यात भाग्यवान ठरले खलील अन्सारी. त्यांचा सध्याचा हुद्दा मुख्य अभियंत्याचा. आता त्यांच्याकडे कोकण प्रदेशाचा मूळ पदभार, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ व महाराष्टÑ कृष्णा खोरे विकास महामंडळ असे दोन्हीचे कार्यकारी संचालकपद अशी तीनपदे दिली आहेत. विशेष म्हणजे जलसंपदा मंत्री महाजन यांचे खाजगी सचिव निशिकांत देशपांडे यांच्याच हाजीअली येथील शासकीय निवासस्थानात त्यांच्याच शेजारी अन्सारींना घरही मिळाले आहे.
...तरीही विशेष कृपा
अन्सारींनी फक्त ६ टक्के उद्दिष्टपूर्ती करूनही त्यांच्यावर विभागाने कृपा केली. ज्यांनी ७० ते ११५ टक्के उद्दिष्ट पूर्ती केली ते मात्र विभागाच्या लेखी बिनकामाचे ठरले आहेत.
अशीच मेहरनजर संजय कुलकर्णी यांच्यावर झाली. त्यांच्याकडे तापी प्रदेश जळगावचा मुख्य अभियंत्याचा आणि तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकाचाही अतिरिक्त पदभार देण्यात आला तर अजय कोहिरकर यांच्याकडे औरंगाबादचा मुख्य अभियंत्याचा व गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकाचाही अति. पदभार आला.