पोस्टमन नव्हे, एजंटदादा पोहोचवणार ‘टपाल’

By Admin | Published: March 10, 2017 05:05 AM2017-03-10T05:05:43+5:302017-03-10T05:05:43+5:30

पत्र, मनीआॅर्डर, पार्सल अशा विविध सेवा देणारे खाकीतील पोस्टमनकाका म्हणजे टपाल विभागाची जीवनवाहिनीच आहे. नागरिक आणि टपाल विभागातील एक जिव्हाळ्याचा दुवा

Postman not to send agent, 'Mail' | पोस्टमन नव्हे, एजंटदादा पोहोचवणार ‘टपाल’

पोस्टमन नव्हे, एजंटदादा पोहोचवणार ‘टपाल’

googlenewsNext

- विशाल शिर्के,  पुणे

पत्र, मनीआॅर्डर, पार्सल अशा विविध सेवा देणारे खाकीतील पोस्टमनकाका म्हणजे टपाल विभागाची जीवनवाहिनीच आहे. नागरिक आणि टपाल विभागातील एक जिव्हाळ्याचा दुवा म्हणूनच या काकांकडे पाहिले जाते. काळाच्या ओघात आता या कामाची सेवादेखील आऊटसोर्सिंग पद्धतीप्रमाणे केली जाणार आहे. कंत्राटी पद्धतीने नेमलेल्या या एजंटदादांकडून पुण्यात प्रथमच अशी सेवा घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
देशात १ एप्रिल १८५४ रोजी टपाल सेवेला सुरुवात झाली. तेव्हापासून देशाच्या कानाकोपऱ्यात संदेशाचे वहन करण्यात टपाल खात्याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. स्मार्ट मोबाईल, इंटरनेट अशा वेगवान संदेशवहनाच्या काळात टपाल खात्याने महत्त्व टिकवून ठेवले आहे. टपाल विभागाने देखील आपल्या सेवेत अमूलाग्र बदल केला असून, पद्धतीदेखील बदलल्या आहेत.
अगदी दहा-पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत शहरी भागातही पोस्टमनकाकांचा प्रत्येक घराशी जिव्हाळ्याचा संबंध असायचा. एखाद्या व्यक्तीने आपल्या आप्ताचा पत्ता काहीसा अपुरा दिला, तरी ते पत्र नक्की संबंधितापर्यंत पोहोचणार, अशी पोस्टमनकाकांची ख्याती आजही टिकून आहे. इतर सरकारी विभागांप्रमाणे येथेही नवीन पदांच्या भरती प्रक्रियेसाठी विलंब लागतो.
यापूर्वी शहरात वाहतूक नियोजनासाठी ‘ट्रॅफिक वॉर्डन’ म्हणून कंत्राटी कामगारांची भरती करण्यात आली आहे. विविध सरकारी-निमसरकारी कार्यालयांतही कामकाजासाठी कंत्राटी कामगारांवर भिस्त ठेवण्यात येत आहे. त्यात आता टपाल सेवेचीदेखील भर पडणार आहे.

- 496 पुणे शहरात सध्या कार्यरत पोस्टमन

- 44 शहरातील महिला पोस्टमन

- जवळपास १५ ते २० टक्के पोस्टमनची पदे रिक्त आहेत. परिणामी, सध्याच्या उपलब्ध मनुष्यबळावर त्याचा ताण येत असल्याने पोस्टमनचे काम करण्यासाठी २० ते २२ डिलिव्हरी एजंटांची भरती केली जाणार आहे.
त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, येत्या महिनाभरात ती पूर्ण होईल. त्यानंतर निवड झालेल्या एजंटांना प्रशिक्षण देऊन, त्यांच्यावर टपाल वितरणाची जबाबदारी सोपवली जाणार आहे.

पोस्टमन पदाच्या
अनेक जागा रिक्त असल्याने, सध्याच्या मुष्यबळावर ताण येत होता. त्यामुळे पोस्टमनच्या कामासाठी पहिल्यांदाच डिलिव्हरी एजंटांची नेमणूक करण्यात येत आहे. ही नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपाची असेल. गरजेप्रमाणे सेवेच्या कालावधीत वाढही केली जाऊ शकते.
-गणेश सावळेश्वरकर, पोस्टमास्तर जनरल, पुणे विभाग

Web Title: Postman not to send agent, 'Mail'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.