मृत अर्भक समजून चक्क बाहुलीचे केले पोस्टमार्टेम! पंचनामाही केला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 05:38 AM2020-07-11T05:38:38+5:302020-07-11T05:42:28+5:30

पोस्टमार्टेम सुरू असताना बाहुल्याच्या आतील स्पंज बाहेर आल्याने बाहुले असल्याचे समोर आले.

Postmortem of a doll with the understanding of a dead baby! Panchnamahi did | मृत अर्भक समजून चक्क बाहुलीचे केले पोस्टमार्टेम! पंचनामाही केला

मृत अर्भक समजून चक्क बाहुलीचे केले पोस्टमार्टेम! पंचनामाही केला

Next

- अनिल गवई
खामगाव (बुलडाणा) : तालुक्यातील बोरजवळा येथील तलावात गुरुवारी रात्री अर्भक सापडले. या घटनेमुळे गावात विविध शंकांना पेव फुटले. अशातच पोलीस, पोलीस पाटील व ग्रामस्थांनी या अर्भकाला पोर्स्टमार्टेमसाठी सामान्य रुग्णालयात आणले. तेथे हे अर्भक नसून बाहुले असल्याचे स्पष्ट झाले.
अर्भक आढळल्याची माहिती मिळताच ठाणेदार सचिन चव्हाण यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पंचनामा करून पोलीस पाटील व गावकऱ्यांच्या मदतीने पोस्टमार्टेमसाठी अर्भक खामगाव उपजिल्हा सामान्य रुग्णालयात आणले.

पोस्टमार्टेम सुरू असताना बाहुल्याच्या आतील स्पंज बाहेर आल्याने बाहुले असल्याचे समोर आले. सामान्य रुग्णालयातील डॉ. वैद्य यांनी ही प्रकार उजेडात आणला. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. रात्री १०.३० वाजतापासून सकाळी ११.३० वाजेपर्यंत म्हणजे सुमारे २५ तासांचा अवधी अर्भक नसून बाहुली आहे, हे शोधायला लागले.

कोरोनाच्या भीतीने हात लावणे टाळले!
तलावाच्या काठावर चिखलात सापडलेल्या बाहुलीची योग्य ती खात्री केली नाही. तसेच कोरोनाच्या भीतीने कुणीही तिला हात न लावल्यामुळे पुढील प्रकार घडल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

Web Title: Postmortem of a doll with the understanding of a dead baby! Panchnamahi did

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.