व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा आणि प्रवेश परीक्षा पुढे ढकला; आदित्य ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 03:46 PM2020-08-24T15:46:26+5:302020-08-24T16:09:28+5:30
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी
मुंबई: कोरोनाची देशातील परिस्थिती पाहता व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन / प्रत्यक्ष सर्व परीक्षा तसेच या संबंधित प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करणारे पत्र युवासेना अध्यक्ष आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. कोरोनाची सध्यपरिस्थिती पाहता आपण स्वतः यामध्ये लक्ष घालून देशातील विद्यार्थ्यांच्या होताच निर्णय घ्यावा असे त्यांनी पत्राद्वारे नमूद केले आहे. दरम्यान शैक्षणिक वर्षाची सुरुवात जून ते मे करण्याऐवजी जानेवारी ते डिसेंबर अशी रचना आपण करू शकतो हे देखील त्यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
I have written to the Hon’ble Prime Minister, Shri @narendramodi ji on the health risk that the proposed exams of various streams, and entrance exams, would have for students and families across India and for his personal intervention. pic.twitter.com/nBAk0Ef7od
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 24, 2020
अव्यवसायिक अभ्यासक्रमाचे बरेचसे मूल्यमापन पूर्ण झाले असून अंतिम परीक्षांचे मूल्यमामापनातील महत्त्व १० टक्क्यांहून जास्त असणार नाही. त्यामुळे विद्यापीठांनी ठरविलेल्या गुणपद्धतीप्रमाणे त्यांचा निकाल लावला जाऊ शकतो असे त्यांनी सादर पत्रात म्हटले आहे. यामुळे आपण भविष्यातील कोरोनाच्या मोठ्या प्रमाणावरील संसर्गाला आळा घालण्याचा प्रयत्न करू शकतो असे ही त्यांनी नमूद केले आहे.