उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषदेची मतमोजणी पुढे ढकलली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 07:55 PM2018-05-23T19:55:06+5:302018-05-23T19:55:48+5:30
- उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषदेसाठी झालेल्या निवडणुकीची नियोजित मतमोजणी २४ मे रोजी होणार होती़ मात्र, निवडणूक आयोगाने बुधवारी सायंकाळी दिलेल्या निर्देशानुसार आता ही मतमोजणी ढकलण्यात आली आहे.
उस्मानाबाद - उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषदेसाठी झालेल्या निवडणुकीची नियोजित मतमोजणी २४ मे रोजी होणार होती़ मात्र, निवडणूक आयोगाने बुधवारी सायंकाळी दिलेल्या निर्देशानुसार आता ही मतमोजणी ढकलण्यात आली आहे़
उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषदेसाठी भाजपचे सुरेश धस व आघाडी पुरस्कृत अशोक जगदाळे यांच्यात काट्याची टक्कर झाली़ २१ मे रोजी या जागेसाठी मतदानही घेण्यात आले़ तब्बल ९९़६० टक्के मतदान या जागेसाठी झाले आहे़ २४ मे रोजी उस्मानाबाद येथे मतमोजणी नियोजित होती़ येथील प्रशासनाने मतमोजणीची तयारीही पूर्ण केली़ दरम्यान, सायंकाळी निवडणूक आयोगाने ही मतमोजणी तूर्त नियोजित दिवशी करु नये, असे निर्देश दिले आहेत़ त्यामुळे गुरुवारी होणारी मतमोजणी आता पुढे ढकलण्यात आली आहे़
तारीख निश्चित नाही़
यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ़राधाकृष्ण गमे यरांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, निवडणूक आयोगाकडे नियोजित दिवशी मतमोजणी करण्यासाठी आम्ही परवानगी मागितली होती़ मात्र, सायंकाळी त्यांच्याकडून मतमोजणी २४ मे रोजी घेऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत़ पुढील तारीखही या निर्देशात कळविण्यात आली नाही़ त्यामुळे आयोगाचे पुढील निर्देश येईपर्यंत मतमोजणी होणार नसल्याचेही डॉग़मे यांनी सांगितले.