‘पद्मावती’चे प्रदर्शन पुढे ढकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 06:16 AM2017-11-20T06:16:20+5:302017-11-20T06:17:35+5:30

‘पद्मावती’ या ऐतिहासिक कथानकावरील चित्रपटाची १ डिसेंबर ही प्रदर्शनाची नियोजित तारीख ‘व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स’ या निर्मात्या व वितरण कंपनीने स्वत:हून पुढे ढकलली आहे.

Postponed the performance of 'Padmavati' | ‘पद्मावती’चे प्रदर्शन पुढे ढकलले

‘पद्मावती’चे प्रदर्शन पुढे ढकलले

Next

मुंबई : चित्रपटगृहांत झळकण्यापूर्वीच वादाचा विषय ठरलेल्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या ऐतिहासिक कथानकावरील चित्रपटाची १ डिसेंबर ही प्रदर्शनाची नियोजित तारीख ‘व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स’ या निर्मात्या व वितरण कंपनीने स्वत:हून पुढे ढकलली आहे.
निर्मात्यांनी प्रदर्शनासाठी केलेला अर्ज ‘अपूर्ण’ आहे असे कारण देत चित्रपट सेन्सॉर बोर्डानेही अद्याप या चित्रपटाला जाहीर प्रदर्शनाचे प्रमाणपत्र दिलेले नाही. ‘व्हायकॉम १८’च्या प्रवक्त्याने रविवारी एका निवेदनात म्हटले की, आम्ही एक जबाबदार कंपनी आहोत व या देशातील कायदे व सेन्सॉर बोर्डासह सर्व वैधानिक संस्थांविषयी आम्हाला आदर आहे. सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख नंतर जाहीर केली जाईल. काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी या चित्रपटाचा मुंबईत माध्यम प्रतिनिधींसाठी खासगी शो आयोजित केला होता. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. त्याच संदर्भात बोर्डाचे एक सदस्य अर्जुन गुप्ता यांनी भन्साळी प्रसिद्धीसाठी मुद्दाम वाद निर्माण करीत असल्याचा आरोप केला.

Web Title: Postponed the performance of 'Padmavati'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.