लेखी आश्वासनानंतर मराठा समाजाची उपोषणाला स्थगिती
By admin | Published: June 5, 2017 08:15 PM2017-06-05T20:15:37+5:302017-06-05T20:15:37+5:30
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी ३० मे पासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणास बसलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या प्रतिनिधींनी
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी ३० मे पासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणास बसलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या प्रतिनिधींनी अखेर सोमवारी उपोषणास स्थगिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाची रविवारी रात्री आझाद मैदानात येऊन भेट घेतली. शिवाय लेखी आश्वासन देत उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले, त्याला प्रतिसाद देत आंदोलकांनी तूर्तास आंदोलन स्थगित केले आहे.
उपोषणकर्ते संभाजी पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या मागण्यांवर पाटील यांनी शिष्टमंडळासोबत सखोल चर्चा केली. शिवाय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर यासंदर्भात लेखी आश्वासन देण्यात आले आहे. या आश्वासनानुसार, मुख्यमंत्री मराठा आरक्षणावर पावसाळी अधिवेशनात स्वत: निवेदन देतील. प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतीगगृह उभारण्यास जागा
उपलब्ध करून देण्याच्या कामाला प्राधान्यता दिली जाईल. मराठा समाजासाठी सारथी संशोधन व प्रशिक्षण संस्था जुलै महिन्यात
कार्यान्वित करण्याचे ठोस आश्वासन पाटील यांनी लेखी स्वरूपात दिल्याचे समन्वयक संदीप जाधव यांनी सांगितले. जाधव म्हणाले की, केवळ लेखी आश्वासनावर आंदोलनाला स्थगिती दिलेली आहे. यापुढेही आंदोलन सुरूच राहील.
पावसाळी अधिवेशनापर्यंत लेखी आश्वसानांची पूर्तता व्हावी, म्हणून प्रत्येक आमदाराला या लेखी आश्वासनाचे पत्र दिले जाईल. शिवाय त्याचा पाठपुरावा केला जाईल. केवळ ५७ मराठ्यांनी उपोषण करून हा विजय मिळवलेला नसून, हजारो मराठ्यांनी उपोषणकर्त्यांना ६ दिवसांत दिलेल्या पाठिंब्यामुळे विजय साकारल्याचे जाधव यांनी सांगितले.