खड्ड्यांनी घेतला पोलिसाचा जीव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2016 05:26 AM2016-10-24T05:26:04+5:302016-10-24T05:26:04+5:30
दापोली पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे आणि खड्ड्यामुळे दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेले दिनकर सीताराम गावित (२७, मूळ गाव रा. ओझोरखेड, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) यांचा
दापोली (जि.रत्नागिरी) : दापोली पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे आणि खड्ड्यामुळे दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेले दिनकर सीताराम गावित (२७, मूळ गाव रा. ओझोरखेड, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) यांचा रविवारी कोल्हापूर येथे उपचारांदरम्यान मृत्यू झाला. १ आॅक्टोबर रोजी यांचा अपघात झाला होता.
खेड पोलीस उपविभागीय कार्यालयातून दापोलीकडे येत असताना दापोली-खेड रोडवरील नारगोली-टाळसुरे दरम्यान पडलेल्या भल्यामोठ्या खड्ड्यात त्यांची
दुचाकी आदळून अपघात झाला होता. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली.
कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात ते २२ दिवस मृत्यूशी झुंज देत होते. रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. तीन वर्षांपूर्वी रत्नागिरी पोलीस दलात दाखल झालेल्या गावित यांच्या पश्चात आई वडील, पत्नी मुले असा परिवार आहे. (प्रतिनिधी)