मागास जिल्ह्यांसाठी कुक्कुटपालन योजना

By admin | Published: March 12, 2015 01:42 AM2015-03-12T01:42:47+5:302015-03-12T01:42:47+5:30

राज्यातील मागास जिल्ह्यांचे दरडोई उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने दारिद्रयरेषेखालील नागरिकांसाठी परसातील कुक्कुटपालन योजना सुरू

Poultry scheme for backward districts | मागास जिल्ह्यांसाठी कुक्कुटपालन योजना

मागास जिल्ह्यांसाठी कुक्कुटपालन योजना

Next

पुणे : राज्यातील मागास जिल्ह्यांचे दरडोई उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने दारिद्रयरेषेखालील नागरिकांसाठी परसातील कुक्कुटपालन योजना सुरू करण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या या योजनेसाठी दरडोई उत्पन्न कमी असणारे १५ जिल्हे निवडण्यात आले आहेत.
योजनेसाठी निवडलेल्या जिल्ह्यांतील चार ते पाच गावांमधल्या दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना परसातील कुक्कुटपालनासाठी शंभर टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. एका कुटुंबाला तब्बल ४५ पक्षी देण्यात आले असल्याची माहिती साहाय्यक आयुक्त डॉ. रा. र. चंदेल यांनी दिली. कुक्कुटपालन हा कमी खर्चात उत्पन्न देणारा महत्त्वाचा पूरक उद्योग आहे. त्यामुळे वैयक्तिक लाभार्थी निवडून त्यांना या योजनेसाठी प्रोत्साहित करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे चंदेल यांनी सांगितले. ही योजना यशस्वी झाल्यास अन्य जिल्ह्यातही ती सुरू करण्याचा शासनाचा विचार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Poultry scheme for backward districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.