पारस औष्णिक विद्युत केंद्रातील वीजनिर्मिती ठप्प!

By Admin | Published: November 19, 2016 02:05 AM2016-11-19T02:05:34+5:302016-11-19T02:05:34+5:30

बॉयलर’मध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे संच क्र. ४ बंद.

Power dissipation in Paras thermal power station! | पारस औष्णिक विद्युत केंद्रातील वीजनिर्मिती ठप्प!

पारस औष्णिक विद्युत केंद्रातील वीजनिर्मिती ठप्प!

googlenewsNext

अतुल जयस्वाल
अकोला, दि. १८- महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीच्या बाळापूर तालुक्यातील पारस येथील औष्णिक विद्युत केंद्रातील कार्यान्वित असलेला २५0 मेगावॉट क्षमतेचा संच क्र. ४ शुक्रवारी अचानक बंद पडल्याने या केंद्रातून होणारी वीजनिर्मिती ठप्प झाली आहे. या संचाच्या ह्यबॉयलर ट्युबह्णला गळती लागल्यामुळे तो नादुरुस्त झाला असून, येत्या ४८ तासांत दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन संच पुन्हा कार्यान्वित होणार असल्याची माहिती प्रकल्पाचे मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.
पारस येथील औष्णिक विद्युत केंद्रात २५0 मेगावॉट क्षमतेचे दोन संच कार्यान्वित आहेत. पूर्वीचे संच क्र. १ व २ जुने झाल्यामुळे संच क्र. ३ व ४ हे नवे संच कार्यान्वित करण्यात आले आहेत. यापैकी संच क्र. ३ हा गत २५ ऑक्टोबरपासून बंद असल्यामुळे त्यातून वीजनिर्मिती बंद आहे. त्याऐवजी कालपर्यंत संच क्र. ४ मधून वीजनिर्मिती सुरू होती. शुक्रवारी पहाटे ४.४२ वाजता या संचाच्या ह्यबॉयलर ट्युबह्णला गळती लागली. हा बिघाड लक्षात आल्यानंतर मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर यांच्या सूचनेनुसार संच बंद करण्यात आला. आकस्मिक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे या केंद्रातील वीजनिर्मिती पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळपासूनच मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर यांच्या नेतृत्वात बॉयलर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. औष्णिक केंद्राती अभियंत्यांची चमू कार्यरत असून, हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या ४८ तासांत संच कार्यान्वित होऊन वीजनिर्मिती पुन्हा सुरू होईल, असे मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर यांनी सांगितले.

संच क्र. ४ च्या बॉयलरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. याला ह्यबॉयलर ट्युब लिकेजह्ण असे म्हटले जाते. त्यामुळे संच बंद पडला असून, वीजनिर्मिती ठप्प झाली आहे. येत्या ४८ तासांत दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन संच पुन्हा कार्यान्वित होईल.
- राजेंद्र बावस्कर, मुख्य अभियंता, औष्णिक विद्युत केंद्र, पारस.

Web Title: Power dissipation in Paras thermal power station!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.