वीज कर्मचा:यांना पगारवाढ
By admin | Published: June 25, 2014 03:10 AM2014-06-25T03:10:32+5:302014-06-25T03:10:32+5:30
वीज कंपन्यांच्या 85 हजार कर्मचा:यांना तब्बल 25 टक्के पगारवाढ देण्याचा निर्णय मंगळवारी ऊर्जामंत्री अजित पवार यांनी जाहीर केला.
Next
>मुंबई : वीज कंपन्यांच्या 85 हजार कर्मचा:यांना तब्बल 25 टक्के पगारवाढ देण्याचा निर्णय मंगळवारी ऊर्जामंत्री अजित पवार यांनी जाहीर केला. ही वाढ 1 एप्रिल 2क्13 पासून लागू करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी कर्मचा:यांना ही खूशखबर मिळाली आहे.
महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांच्या कर्मचा:यांना या पगारवाढीचा प्रत्यक्ष लाभ ऑगस्टमध्ये हाती येणा:या जुलैच्या वेतनात मिळेल. 1 एप्रिल 2क्13 पासूनची थकबाकी टप्प्याटप्प्याने दिली जाईल. करारामध्ये त्याचे स्वरूप नमूद केलेले असेल. चालू आठवडाअखेर वीज कर्मचा:यांच्या विविध संघटनांशी पगारवाढीचा करार करण्यात येणार आहे. पगारवाढीसंदर्भात ऊर्जामंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक अजेय मेहता, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)