सरकारकडून भुजबळांविरुद्ध सत्तेचा गैरवापर - शरद पवार
By admin | Published: February 2, 2016 12:29 PM2016-02-02T12:29:47+5:302016-02-02T12:30:24+5:30
एकाच प्रकरणाच्या तपासासाठी तीन वेळा छापे मारून राज्य सरकार भुजबळांना टार्गेट करत सत्तेचा गैरवापर करत असल्याची टीका शरद पवार यांनी केली.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - एकाच प्रकरणाच्या तपासासाठी तीन वेळा छापे मारून राज्य सरकार भुजबळांना टार्गेट करत सत्तेचा गैरवापर करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाकडून काल पुन्हा मारण्यात आलेले छापे आणि भुजबळ यांचा पुतण्या समीर भुजबळ याला अटक करण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सरकारवर ताशेरे ओढत भुजबळ यांची पाठराखण केली. 'भुजबळांबद्दल तक्रार करणारे एकाच पक्षाचे असून एका खासदारा-या इशा-याने संपूर्ण तपासयंत्रणा कामाला लागली आहे. राष्ट्रवादीला सातत्याने टार्गेट करण्यात येत असून सत्तेचा गैरवापर करून राजकीय खेळी खेळण्यात येत आहे' अशी टीका पवार यांनी केली. तसेच आमची भूमिका स्वच्छ असून चिंता करण्याचे काहीच कारण नसल्याचे सांगत तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्याचा सल्लाही पवारांनी दिला.