आमदार लांडेंचे शक्तिप्रदर्शन
By admin | Published: September 28, 2014 12:35 AM2014-09-28T00:35:26+5:302014-09-28T00:35:26+5:30
प्रचंड शक्तिप्रदर्शन करत भोसरीचे आमदार विलास लांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज शनिवारी दाखल केला.
Next
>भोसरी : प्रचंड शक्तिप्रदर्शन करत भोसरीचे आमदार विलास लांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज शनिवारी दाखल केला. तत्पूर्वी, काढलेल्या पदयात्रेने आजपयर्ंतचे सर्व विक्रम मोडले. सुमारे 2क् हजारांच्या जनसमुदायातून उमटलेल्या जयघोषाने सारा परिसर दुमदुमून गेला.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदार लांडे यांची उमेदवारी शुक्रवारी जाहीर झाली. त्यानुसार शनिवारी अखेरच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी पदयात्र काढली. तत्पूर्वी आमदार लांडे आपल्या सहका:यांसह लांडेवाडी चौकातील श्री तुळजा भवानी मंदिरात पोहोचले. तेथे त्यांनी मातेचे दर्शन घेऊन आरती केली, तसेच गोमातेचेही दर्शन घेतले. मंदिर परिसरातच कार्यकर्ते व मतदारांशी हितगूज केल्यानंतर तेथून लांडे यांनी भोसरीचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिरात गेले. या ठिकाणी नारळ वाढवून पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला.
भोसरीचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात आमदार लांडे यांनी पूजा बांधली तसेच विठ्ठल रुक्मीणी व मारुती मंदिरातही भगवंतांचे दर्शन घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले. रॅलीत स्वयंस्फूर्तीने जमलेल्या जनसमुदायामुळे भोसरी गाव तसेच परिसराला जत्रेचे स्वरुप आले. लांडेवाडी चौकातून सुरू झालेली ही रॅली भाजीमंडई, लोंढे आळी, लांडगे आळी, भैरवनाथ मंदिर, विठ्ठल रुख्मीणी मंदिर, मारुती मंदिर, पीसीएमसी चौक, भोसरी गाव आदी भागातून मार्गक्रमण करून पुन्हा लांडेवाडी चौकात आली. यावेळी ठिकठिकाणी, चौकाचौकात सुवासिनींनी कुंकुंमतिलक लावून स्वागत केले.
सकाळी दहा वाजता निघालेल्या या रॅलीचा समारोप दुपारी साडेबाराच्या सुमारास छत्रपती शिवाजी चौक, लांडेवाडी येथे झाला. या पदयात्रेत माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, राष्ट्रवादीचे भोसरी विधानसभाध्यक्ष शरद बो:हाडे, माजी महापौर तथा नगरसेविका मोहिनीताई लांडे, माजी चेअरमन सुरेखा लोंढे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अजरून ठाकरे, विजय लोखंडे यांच्यासह नगरसेवक अजित गव्हाणो, नितीन लांडगे, विश्?वनाथ लांडे, तानाजी खाडे, संजय वाबळे, समीर मासुळकर, चंद्रकांत वाळके, जितेंद्र ननावरे, अरुण बोर्?हाडे नगरसेविका पौर्णिमा सोनवणो, स्वाती साने, साधना जाधव, मंदाताई आल्हाट, विनया तापकीर, शुभांगी बो:हाडे, मंदाकिनी ठाकरे, सुनीता गवळी, आशाताई सुपे, अनुराधा गोफणो, सुरेखा गव्हाणो, शिक्षण मंडळाचे सदस्य धनंजय भालेकर, निवृत्ती शिंदे तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्येकर्ते अप्पा सायकर, बाजीराव लांडे यांच्यासह इतर नगरसेवक, पदाधिकारी व कार्येकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला बचत गटाच्या कार्यकत्र्या उपस्थित होत्या.
आमदार लांडे यांनी अण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये असलेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघ
कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. (वार्ताहर)
एवढय़ा मोठय़ा संख्येने आपण उपस्थित झाला यावरून तुमचे माङयावर असलेले प्रेम दिसून आले आहे. या प्रेमाने मी भारावून गेलो असून याच बळावर आपली हॅटट्रीक होईल हे निश्चित आहे. मतदारांपयर्ंत पोहोचण्यासाठी केवळ 15 दिवसांचा कालावधी राहिलेला आहे. त्यामुळे कार्यकत्र्यांनी घराघरात पोहोचावे. येत्या 15 तारखेला विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्यावी. मतदारसंघाचा आपण विकास केला असून यापुढेही ही विकासाची गंगा अशीच आपल्याला वाहवत ठेवायची आहे. केवळ एवढेच नव्हे तर सर्वसामान्यांना न्याय, कष्टक:यांच्या हाताला काम व विद्यार्थी तसेच सुशिक्षीत बेरोजगारांसाठी भरीव कार्य करायचे आहे. यासाठी आपल्या सर्वांचा आशीर्वाद माङया पाठीशी असल्याने ही कामे आपण तडीस नेऊ असा ठाम विश्वास आमदार लांडे यांनी यावेळी व्यक्त केला.
- विलास लांडे, आमदार