राजकुमार बडोलेंच्या बुद्धीची कीव येते - उदयनराजे

By admin | Published: October 15, 2016 02:05 PM2016-10-15T14:05:49+5:302016-10-15T18:54:41+5:30

बडोलेंनी आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या बुद्धीची कीव येते, अशी टीका उदयनराजेंनी केली आहे

The power of prince prince bdolane - Udayan raje | राजकुमार बडोलेंच्या बुद्धीची कीव येते - उदयनराजे

राजकुमार बडोलेंच्या बुद्धीची कीव येते - उदयनराजे

Next
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 15 - बडोलेंनी आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या बुद्धीची कीव येते, अशी टीका उदयनराजेंनी केली आहे. कोल्हापुरातील मराठा क्रांती मूक मोर्चात सहभागी झाले असताना उदयनराजेंनी हे वक्तव्य केलं आहे. आज पैसेवाल्यांची आंदोलनं यशस्वी होत आहेत, असं खळबळजनक वक्तव्य सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केलं आहे. नवाब मलिक, खासदार संभाजीराजे छत्रपतींपाठोपाठ आता उदयनराजे भोसले यांनीही बडोलेंच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. 
 
मराठा समाजाच्या मागण्यांबाबत काही वर्षांपूर्वीच सकारने निर्णय घ्यायला हवा होता. बडोलेंनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या बुद्धीची कीव येते. अशा वक्तव्यामुळे समाजामध्ये वितुष्ट निर्माण होते, असं उदयनराजे बोलले आहेत. अॅट्रॉसिटी कायदा रद्दच झाला पाहिजे. इतर समाजाचे मोर्चे प्रतिउत्तर म्हणून काढले जात आहेत, हे हसू येण्यासारखे आहे. ही मोर्चांची स्पर्धा नाही, असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे. 
 
(पैसेवाल्यांची आंदोलने यशस्वी होत आहेत, बडोले याचं खळबळजनक वक्तव्य)
(VIDEO : कोल्हापुरात मराठा क्रांतीमोर्चाची यशस्वी सांगता)
 
आज पैसेवाल्यांची आंदोलनं यशस्वी होत आहेत, असं खळबळजनक वक्तव्य सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केलं आहे. औरंगाबादेत इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिवलमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. कोपर्डीच्या नावाखाली जर अनुसुचित जातींच्या लोकांवर अन्याय होणार असेल, तर तो आम्ही सहन करणार नाही, प्रसंगी मंत्रिपदाचा राजीनामा देऊ असंही ते बोलले आहेत.  'कोणीही येतं आणि आरक्षणाची मागणी करतं. ज्याच्याकडं पैसे जास्त आहेत, त्यांची आंदोलनं यशस्वी होतात,' असं म्हणत बडोले यांनी आरक्षणासाठी निघणाऱ्या मोर्चांवर जोरदार हल्ला चढवला. 
 
दरम्यान बडोले यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रामध्ये मुठभर लोकं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्धभवातात. समाजिक सलोखा बिघडवण्याचा भाजपचा प्रयत्न करत आहेत अशी टीका राष्ट्रवादी  काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. तर राजकुमार बडोले यांना राज्यातून हद्दपार करा, बडोले यांचा महाराष्ट्रात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं खासदार छत्रपती संभाजी राजे बोलले आहेत. 
 

Web Title: The power of prince prince bdolane - Udayan raje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.