राज्याच्या वीजपुरवठ्याची मदार खासगी क्षेत्रावर; ५५%पुरवठा खासगी क्षेत्राकडून

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 01:15 AM2020-03-08T01:15:52+5:302020-03-08T06:50:25+5:30

महानिर्मितीने विविध औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्रांमध्ये क्षमता वाढीसाठी कृती आराखड्यास मान्यता दिली आहे.

The power supply of the state to the private sector; 55% supply from the private sector pnm | राज्याच्या वीजपुरवठ्याची मदार खासगी क्षेत्रावर; ५५%पुरवठा खासगी क्षेत्राकडून

राज्याच्या वीजपुरवठ्याची मदार खासगी क्षेत्रावर; ५५%पुरवठा खासगी क्षेत्राकडून

Next

मुंबई : भारनियमनाच्या चटक्यांमधून आठ वर्षांपूर्वीच मुक्ती मिळालेला महाराष्ट्र वीजपुरवठ्यात स्वयंपूर्ण असल्याचे दिसत असले तरी महानिर्मितीकडून होणाऱ्या वीजनिर्मितीत गेल्या तीन वर्षांत घट झाली आहे, तर खासगी क्षेत्राकडून होणाºया वीजपुरवठ्यात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. खासगी क्षेत्राच्या विजेचा टक्का ५५ पेक्षाही जास्त झाला असून, महानिर्मितीची झेप ४१ टक्क्यांवरच थंडावली आहे. त्यामुळे वीजपुरवठ्याबाबत खासगी क्षेत्रावरील महाराष्ट्राची मदार वाढताना दिसत आहे.

महाराष्ट्रातील विजेचा दरडोई वापर १०८३ युनिट असून देशात ते प्रमाण ७८४ युनिट आहे. गेल्या तीन वर्षांत राज्यातील वीज वापराचे प्रमाण २५ टक्क्यांनी वाढले आहे. विजेची मागणी २०१६-१७ साली १६८८ मेगावॅट होती. ती आता २० हजार ३८९ मेगावॅटपर्यंत वाढली आहे.

महावितरण, बेस्टच्या वीज खरेदीचे प्रमाणही वाढू लागले आहे. या वीज खरेदीसाठी महावितरणने २०१७-१८ साली मासिक १९३ कोटी रुपये मोजले होते. यंदा ते प्रमाण २१२ कोटींवर पोहोचले आहे. राज्यात सर्वाधिक वीज ही उद्योगांसाठी (३४,४४८ दशलक्ष युनिट) वापरली जाते. त्याखालोखाल घरगुती वीज वापर (२३,३५३), कृषी (२०,९३०) वाणिज्य (११,०१३), सार्वजनिकसेवा (३८४९), रेल्वे (१३९) यांचा क्रमांक लागतो.

महानिर्मितीचे क्षमता वाढीचे प्रयत्न
महानिर्मितीने विविध औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्रांमध्ये क्षमता वाढीसाठी कृती आराखड्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार भुसावळ येथे ६६० मेगावॅट आणि कोराडी येथे १३२० मेगावॅट वीजनिर्मितीस महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगानेही तत्त्वत: मंजुरी दिली असून, हे काम येत्या काही महिन्यांत सुरू होईल अशी अपेक्षा आहे.

वितरण हानी घटली
गेल्या चार वर्षांतल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे महावितरणची वीजपुरवठ्यातील वितरण हानी १४.६८ टक्क्यांवरून १२.१७ टक्के इतकी कमी झाली आहे. मात्र, बेस्ट (४.३४), रिलायन्स (८.३६) आणि टाटा पॉवर (०.८९)च्या तुलनेत ती खूप जास्त आहे. राज्यातील ८६ टक्के वितरण व्यवस्थेचा भार महावितरणच्या खांद्यावर आहे. त्यामुळे ही वितरणहानी जास्त असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: The power supply of the state to the private sector; 55% supply from the private sector pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज