उद्या बदलापूर-कर्जत मार्गावर ‘पॉवर, ट्रॅफिक’ ब्लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 05:37 AM2017-12-02T05:37:50+5:302017-12-02T05:38:10+5:30
नेरळ स्थानकातील पादचारी पुलासाठी रविवारी गर्डर उभारण्यात येणार आहे. यामुळे बदलापूर-कर्जत स्थानकादरम्यान अप आणि डाउन मार्गावर पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येईल.
मुंबई : नेरळ स्थानकातील पादचारी पुलासाठी रविवारी गर्डर उभारण्यात येणार आहे. यामुळे बदलापूर-कर्जत स्थानकादरम्यान अप आणि डाउन मार्गावर पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येईल. सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. यामुळे काही लोकल फेºयांसह मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.
सीएसएमटी येथून सकाळी ०९.११ वाजता आणि १०.३६ वाजता सुटणारी सीएसएमटी-कर्जत लोकल अंबरनाथपर्यंतच चालविण्यात येईल. कर्जत येथून दुपारी १२.०१ मिनिटांनी कर्जत-सीएसएमटी लोकल अंबरनाथ स्थानकापासून चालविण्यात येईल. रविवारी सकाळी ०९.३८ आणि ११.१५ वाजता सुटणारी सीएसएमटी-कर्जत लोकल बदलापूर स्थानकांपर्यंत असेल. मेल, एक्स्प्रेसही कर्जत-पनवेल दिवामार्गे धावतील. कल्याण येथे उतरणाºया प्रवाशांसाठी या एक्स्प्रेसला दिवा स्थानकात तात्पुरत्या स्वरूपाचा थांबा देण्यात येईल.