शक्तिशाली स्फोटाने हादरली डोंबिवली, ५ ठार, १०० हून अधिक जखमी
By Admin | Published: May 26, 2016 11:51 AM2016-05-26T11:51:08+5:302016-05-26T17:11:25+5:30
डोंबिवली पूर्वेकडील MIDC परिसरात केमिकल फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट होऊन ५ ठार तर १०० हून अधिक नागरिक जखमी झाले.
ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. २६ - डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी परिसरातील केमिकल फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट होऊन ५ ठार तर १००हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारा 'प्रोबेझ' कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला आणि संपूर्ण परिसर स्फोटाच्या आवाजाने दणाणून गेला. या स्फोटात १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे हर्बर्टब्राऊनसह आजूबाजूच्या कंपन्याचेही मोठे नुकसान झाले आहेे.
या स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की स्फोटाच्या आवाजाने २ ते ३ किमी परिसर दणाणून गेला. तर आसपासच्या परिसरातील अनेक इमारती तसेच गाड्यांच्या काचाही फुटल्या. १६ इमारतींचे अतोनात नुकसान झाले आहे.
या स्फोटात कंपनीतील तसेच त्या परिसरातील रस्त्यावरचे व इमारतीत नागरिकांसह एकूण १०० जण जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
तर कंपनीच्या परिसरात मालाची ने-आण करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या बैलगाड्यांपैकी दोन गाड्यांचे गंभीर नुकसान झाले असून एक बैलही ठार झाला आहे. दरम्यान बॉयलरचा हा स्फोट नेमका कशामुळे झाला ते अद्याप समजू शकलेले नाही.
रुग्णालयातील आकडेवारी
शिवम -30 जखमी 7 जण आयसीयूमध्ये
एम्स - 28 जखमी 2 मृत्यू
आयकॉन - 13 जखमी 2 मृत्यू
नेपच्यून - 8 जखमी
शस्त्री नगर - 15 जखमी 1 मृत्यू
Saddened to know about the unfortunate & tragic incident that took place at Dombivali.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 26, 2016
(1/3)
स
दरम्यान या स्फोटाचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून ३ ते ४ रुग्णवाहिकाही दाखल झाल्या आहेत. जखमींवर आयकॉन, ममता, रुक्मिणीबाई, आर.आर व शास्त्रीनगरसह शहरातील ६ रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
डोंबिवलीसह, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर येथून अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. तसेच सीव्हील डिफेन्स व एनडीआरएफचे पथकही दाखल झाले आहे. व अॅडिशनल सीपी आशुतोष डुंबेरही उपस्थित आहेत.