प्रभातरंजन उद्या निवृत्त, महासंचालकाचे आणखी एक पद काही काळ रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 05:18 AM2017-08-30T05:18:16+5:302017-08-30T05:18:25+5:30
गृहरक्षक दलाचे महासमादेशक प्रभातरंजन ३१ आॅगस्टला सेवानिवृत्त होत असून रिक्त होणारे पद गणेशोत्सवानंतर भरले जाणार आहे.
जमीर काझी
मुंबइ : गेल्या तेरा महिन्यापासून रिक्त असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालका बरोबरच येत्या शुक्रवारपासून या दर्जाच्या पदामध्ये आणखी एकाने वाढ होणार आहे. गृहरक्षक दलाचे महासमादेशक प्रभातरंजन ३१ आॅगस्टला सेवानिवृत्त होत असून रिक्त होणारे पद गणेशोत्सवानंतर भरले जाणार आहे. त्यामुळे पदोन्नतीसाठी पात्र असलेले अप्पर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांना काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. सेवाजेष्ठता डावलल्याने उच्च न्यायालयात गेलेल्या होमगार्डचे अप्पर महासंचालक संजय पांडे यांच्याकडे विभागाचा पूर्णवेळ पदभार जावू नये, याची तजवीज केल्यानंतर तसेच बिपीन बिहारी सध्या राज्याची ‘लॉ अॅण्ड आॅर्डर’ची जबाबदारी अत्यंत सक्षमपणे साभाळीत असल्याने गणेशोत्सव व बकरी ईदच्या पाश्वभूमीवर त्यांना हलविले जाणार नसल्याचे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात आले.
गेल्यावर्षी एक आॅगस्टला सतीश माथूर यांनी पोलीस महासंचालकाची धुरा घेतल्यानंतर एसीबीला पूर्णवेळ महासंचालक देण्यात आलेला नाही. अप्पर महासंचालक विवेक फणसाळकर अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. प्रभातरंजन सेवानिवृत्त झाल्याने रिक्त होणाºया पदावर बिपीन बिहारी यांचे सेवाजेष्ठतेच्या आधारावर पदोन्नती निश्चित झाली आहे. गेल्यावर्षी गृह विभागाने एक अध्यादेश काढून संजय पांडे यांचा ९ वर्षापूर्वी तत्कालिन सरकारने मंजूर केलेला दोन वर्षे आठ महिन्याचा सेवा कालावधी अकार्य दिन केला. त्याविरुद्ध पांडेंनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने सरकारला महासंचालक दर्जाचे एक पद रिक्त ठेवायचे आहे.
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदासाठी सुरक्षा महामंडळाचे महासंचालक संजय बर्वे व ठाण्याचे आयुक्त परमबीर सिंह यांच्यापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह यांची नियुक्ती करायची झाल्यास आयुक्तपद पुन्हा ‘डाऊनग्रेड’ करावे लागणार आहे. मात्र दत्ता पडसलगीकर यांना ३१ जानेवारीला दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. सिंह यांचा ठाण्यात जवळपास अडीच वर्षे होवूनही त्यांना तेथून थेट मुंबईची धूरा सांभाळायाची असल्याने त्यांची अद्याप बदली केलेली नाही. त्यांच्या जाग्ोसाठी अप्पर महासंचालक विवेक फणसाळकर,एटीएसचे अतुलचंद्र कुलकर्णी यांची नावे चर्चेत आहेत.